पुणे (दि.७) रोटरीचे माजी प्रांतपाल व शिक्षण तज्ञ,सिंबायोसिस संस्थेचे प्रथम पासून सदस्य प्रमोद जेजुरीकर यांचा त्यांच्या अमृत महोत्सव वर्ष निमित्त पुणे येथे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंबायोसिसचे संस्थापक डॉ.शां.ब.मुजुमदार होते. रोटरीच्या माध्यमातून प्रमोद जेजुरीकर यांनी केलेल्या कामाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. रोटरीच्या माध्यमातून प्रमोद जेजुरीकर यांनी सुरु केलेला इ लर्निंग हा प्रकल्प आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. सध्या भारतात ४०,००० पेक्षा जास्त गरजू शाळांमध्ये रोटरी ई लर्निंग ची सोय करण्यात आली असून आठ लाख मुलांना त्याचा फायदा झाला आहे. इंडिया लिटरसी मिशन या संस्थेचे ई लर्निंग समितीचे प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली होती. भारतात व परदेशात प्रमोद जेजुरीकर यांना ई लर्निंग विषयावर सादरीकरणासाठी अनेकदा निमंत्रित करण्यात येते. सिंबायोसिस या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे ते संस्थापनेपासून सदस्य आहेत व अनेक वर्ष विश्वस्त होते. प्रमोद जेजुरीकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून Service Above Self हा रोटरीचा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, सुप्रसिद्ध उद्योजक रवी पंडित, डॉ.रवींद्र कुलकर्णी, पुण्याचे माजी पोलीस आयुक्त जयंत उमराणीकर, महाराष्ट्र बँकेचे माजी अध्यक्ष डॉ.वसंतराव पटवर्धन, इत्यादी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी प्रमोद जेजुरीकर यांची मुलाखत घेतली.
छायाचित्र : प्रमोद जेजुरीकर.