रोटरीच्यावतीने २७४ विद्यार्थिनींना पुनर्वापर सँनिटरी नॅपकीन वाटप.

Share This News

रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंड व रोटरी क्लब कॅन्टोनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने बी.टी.सहानी नवीन हिंद स्कूल येथे २७४ विद्यार्थिनींना पुनर्वापर करता येणार्‍या सँनिटरी नॅपकीन वाटप करण्यात आले. यांची किंमत सुमारे ८२२००/-आहे. यासाठी फ्रिडम फ्रॉम PCOS व रुची मॉल्स यांनी सहकार्य केले. या कार्यक्रम प्रसंगी रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंडचे अध्यक्ष पवन जोशी, रोटरी क्लब कॅन्टोनमेंटचे अध्यक्ष बिनायक चौधरी, फ्रिडम फ्रॉम PCOS चे डायरेक्टर  दीपक आनंद, रोटरी प्रांतपर्यावरण डायरेक्टर समीर रुपानी, शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पेशवाणी, निना रायसोनी, सारिया मास्टर, आदी मान्यवर, विद्यार्थिनी व स्टाफ उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना पवन जोशी यांनी पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठी त्यात प्लॅस्टिक व अन्य घातक कचरा मिसळू नये यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे संगितले. हेमंत अभ्यंकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  

छायाचित्र :लाभार्थी विद्यार्थिनी व मान्यवर यांचे समूहचित्र