शिक्षक हे पुढची पिढी घडवितात. त्यांना आपत्ती व्यवस्थापन व पर्यावरण याची सखोल माहिती व्हावी यासाठी प्रांतपाल मंजु फडके यांच्या निर्देशाने पुणे महानगर पालिकेच्या शिक्षकांची या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली यात तज्ञ लोकांनी मार्गदर्शन केले. घोले रस्ता येथे संपन्न झालेल्या या कार्यशाळा प्रसंगी प्रांतपाल मंजू फडके, माजी प्रांतपाल प्रमोद जेजूरीकर, रोटरी फॉरच्यूनचे अध्यक्ष श्रीकांत मडघे, रोटरी पुना नॉर्थ अध्यक्ष दीप्ती पुजारी, रोटरी पिंपरी एलिट अध्यक्ष अशोक शिंदे, रोटरी अपटाऊन सचिव अरविन्द मिठसागर, डायरेक्टर राजेंद्रकुमार सराफ, जयदीप मालविय, प्रशिक्षक नायडू सर, ध्रुव फडके, महानगर पालिका उपआयुक्त महेश पाटील, उपआयुक्त राजू नंदकर, क्लास वन ऑफिसर गणेश सोनूणे, एसएनडीटी च्या प्राचार्य नलिनी पाटील व प्रशिक्षणार्थी शिक्षकगण उपस्थित होते.
छायाचित्र :१) उद्घाटन प्रसंगी मान्यवर, २)प्रशिक्षणार्थी शिक्षकगण