रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंडच्या वतीने २४३ महिलांना पुन्हा वापरता येणारे सँनीटरी नॅपकीन वाटप.

Share This News

महिलांच्या मासिक पाळीत वापरण्यात येणा-या नॅपकीन मुळे निसर्गाची व महिलांच्या आरोग्याची हानी होते.यासाठी पुन्हा धुवून वापरता येणार्‍या पर्यावरण स्नेही सँनीटरी  नॅपकीनचे २४३ महिलांना रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंडच्या वतीने वाटप करण्यात आले. विशेष सहकार्य फ्रिडम फ्रॉम PCOS यांनी केले. एकूण किंमत ७५०००/- बापूसाहेब पवार कन्याशाळा भवानीपेठ येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे नियोजित प्रांतपाल शितल शहा, पर्यावरण डायरेक्टर समिर रूपाणी, सहाय्यक प्रांतपाल मुकेश गुप्ता, रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंडचे अध्यक्ष पवन जोशी, फ्रिडम फ्रॉम PCOS चे संस्थापक मनोज उपरेती, आरती पांडे, दिपक आनंत आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी, सदस्य व लाभार्थी महिला उपस्थित होत्या. 

छायाचित्र :मान्यवर व लाभार्थी महिला यांचे समूहचित्र