जीवनशैली आरोग्यदायक बनविण्यासाठी रोटरी क्लब लोकमान्य नगरचा “हेल्दियर मी” प्रकल्प.

Share This News

मनुष्याच्या सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैली मुळे मधुमेह, हृदय विकार, लठ्ठपणा अशा अनेक आजारांनी शरीरात घर केले आहे. व्यायामा द्वारे या आजारांना दूर ठेवणे शक्य आहे. परंतु एकेकट्याने व्यायाम होत नाही. यासाठी रोटरी क्लब लोकमान्य नगरने “हेल्दियर मी” या प्रकल्पाचे आयोजन केले आहे. यामध्ये १० महिन्यात १२ आव्हाने( चॅलेंजेस)पूर्ण करायची आहेत. ती अतिशय सोपी आहेत जसेकी प्रतिदिन काही पावले चालणे, सूर्यनमस्कार, व्यायाम करणे, काही दिवसांसाठी वेगवेगळ्या क्रिडाप्रकारांमध्ये (स्पोर्ट)भाग घेणे, ट्रेकिंग, योगा व झुंबा संबंधीच्या इव्हेंट मध्ये सहभागी होणे, यांचा समावेश आहे. यात सहभागी होणार्‍यांच्या शुल्कामुळे गरजूंना मदत करण्यासाठी निधी उभा राहील. १२ पैकी ९ आव्हाने पूर्ण करणार्‍या सहभागिना मे महिन्यात पदके देण्यात येतील. असे रोटरी क्लब अध्यक्ष २३-२४ मनोज आगरवाल व प्रकल्प प्रमुख  राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अधिक महितीसाठी संपर्क www.healthierme.in