जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘रोटरी क्लब, शिवाजीनगर’ तर्फे प्रथमच ‘आरोग्य संपदा’ हे शिबिर रविवारी (ता. ३) पूर्ण दिवस हर्षल हॉल कर्वे रोड येथे आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. अशा उपक्रमांची सध्या नितांत गरज आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले व शिवाजीनगर रोटरी क्लबचे कौतुक केले. शिबीरात रक्तदाब, हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेचे प्रमाण, वजन, उंची, बॉडी मास इंडेक्स व बॉडी फॅट, बोन मिनरल डेन्सिटी, ऑक्सिजन पातळी, डोळे व दात तपासणी करण्यात आली. मानसिकआरोग्य समस्यांबद्दल माहिती, हेल्थ इन्शुरन्स, आहाराशी निगडित पुस्तके,पौष्टिक पदार्थ व नाडी तरंगिणी सारख्या अत्याधुनिक व संशोधनपर काम करत असलेले शास्त्रज्ञ ह्यांनी स्टॉल लावले होते. सायंकाळी चार वाजता डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. प्रमोद जोग, यांची माहितीपूर्ण व्याख्याने झाली. डाॅ मृणाल नेर्लेकर यांनी आभार मानले.
छायाचित्र – डॉ.शोभा राव मार्गदर्शन करताना.