रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर तर्फे अंध बांधवांसाठी योगदान.

Share This News

गरजूंच्या जीवनात आनंदाचे स्मितहास्य फुलविण्यासाठी रोटरी क्लब तर्फे अनेक उपक्रम घेतले जातात. समजातील विविध क्षेत्रातील गरजूंना होतकरूंना मदत केली जाते. नुकताच रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर यांनी कै.डॉ.रामचंद्र दातीर व कै.सौ.सुलोचना दातीर यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.प.पू शंकर महाराज मठ येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात दातीर परिवारातर्फे अंधजन विकास ट्रस्टच्या ४० अंधबांधवांसाठी व्हाईट केन व भेटवस्तू वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात दातीर परिवरातील पुढची पिढी पुजा दातीर, रोहन दातीर व रोहित दातीर यांच्या हस्ते केन व भेटवस्तू वाटप करण्यात आले. या प्रसंगी अंधबांधव ट्रस्टचे डॉ.विजयकुमार भोर,नारायण देसाई,रोटरी प्रांत ३१३१च्या लोकमान्यनगर क्लब अध्यक्ष मनोज अग्रवाल, सचिव ऋषिकेश बागडे, डिस्ट्रिक्ट ऑफिसर महेश घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते. दातीर यांच्या पुढच्या पिढीतील अमेरिकेत वाढलेल्या मुलांचे सामाजिक भान वाढावे, समजतील विविध घटकांना भेडसावणार्‍या अडीअडचणींची जाणीव व्हावी माणुसकीसाठी योगदान देण्याचे महत्व  कळावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे दातीर यांनी संगितले. तसेच अंधबांधवांसाठी कोल्हापूर दर्शन यात्रेची घोषणा करण्यात आली. ही यात्रा ८ जुलै रोजी अंबाबाई व ज्योतिबा दर्शन अशी होणार आहे. अंधबांधवांनी याबद्दल आनंद व्यक्त केला.

छायाचित्र :मान्यवर व अंधजन यांचे समूहचित्र