रोटरी क्लब पुना नॉर्थ ही गेल्या ६३ वर्षांपासून समजविकासासाठी कार्यरत संस्था आहे. गेल्या दोन वर्षात संस्थेने १.६ कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचा खर्च ४०० पेक्षा जास्त अल्पभूधारक महिलांना गोदान प्रकल्पामध्ये केला आहे. यामुळे महिलांचा त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक विकासा सोबतच किमान ३०० कोटी रुपयांहुन जास्त आर्थिक अभिवृद्धी घडली आहे. रोटरी नॉर्थने महाराष्ट्रातील १३५०० प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना ४५०० पेक्षा जास्त डिजी टॅबसचे वाटप मुलांच्या शैक्षणिक विकासाकरिता करण्यात सुमारे ३.५ कोटी रुपये खर्च केले आहे. तसेच आया नर्सिंग प्रशिक्षण वर्गाद्वारे २५० पेक्षा अधिक आर्थिक दुर्बल महिलांना प्रशिक्षित करून त्यांना नोकरी मिळवून दिल्याने आजपर्यंत ३.५ कोटी रुपयांची आर्थिक अभिवृद्धी घडून आली आहे. क्लबने एकूण रुपये १२ कोटी,१७५० शाळांसाठी टाटा टेक्नॉलॉजीच्या सीएसआर माध्यमातून उपक्रम राबविले यात सुमारे ४.५ लाख लाभार्थी विद्यार्थी व २०००० शिक्षक होते. संस्थेने हाती घेतलेल्या अशा महत्वाकांक्षी समजविकास उपक्रमात पुणे महानगरपालिकेसमवेत कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण आणि संवर्धन, जलसंधारण आणि व्यवस्थापन यासोबतच अनेक रोगनिवारण आणि आरोग्यसेवा प्रकल्पांचा समावेश आहे. साधारणपणे गेल्या ५ वर्षात रोटरी क्लब नॉर्थने सुमारे २० कोटी रुपये खर्च केले, लाभार्थी सुमारे सात लाख,