रोटरी प्रांत ३१३१ च्या वतीने कोथरूड येथील जयाताई सुतार दवाखान्यास नवजात शिशूंचे प्राण रक्षक असे २ बेबी वॉर्मर पुणे महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त केदार वझे यांना सुपूर्त करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी रोटरी फॉरच्यूनचे अध्यक्ष निखिल टकले, रोटरी फिनिक्सच्या अध्यक्ष प्रज्ञा डांगे,रोटरी रॉयलचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सराफ,रोटरी शिवाजीनगरच्या अध्यक्ष मृणाल नेर्लेकर,रोटरी हिलसाईडच्या अध्यक्ष विभावरी देशपांडे,रोटरी प्राईडचे अध्यक्ष उज्ज्वल केले सुतार हॉस्पिटलचे इन्चार्ज डॉ.अमित संकपाळ,स्मिता जोग,प्रदीप डांगे,विनोद देशपांडे,शंतनु खुर्जेकर,योगेश खंडाकल,अजय चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना सहाय्यक आयुक्त केदार वझे यांनी गरजू बच्चू यांच्या अत्यावश्यक सुविधेसाठी रोटरी क्लबने केलेल्या मदतीचे आभार मानले.
छायाचित्र : सहाय्यक आयुक्त वझे व मान्यवर.