रोटरी प्रांत ३१३१चे ५८ क्लब,तसेच रोटरी सिंगापूर,मलेशिया यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रकल्प ममता” अंतर्गत पुणे महानगर पालिकेस ३० इंन्कीब्युटर्स माजी प्रांतपाल शैलेश पालकर यांच्या हस्ते पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांना सुपूर्त करण्यात आले.या प्रकल्पात एकूण ११० इंन्कीब्युटर्स देण्यात येत आहेत. या प्रकल्पास सुमारे ५८ लाख रुपये खर्च आला. अंबर हॉल कोथरूड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पुणे महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.आशिष भारती,रोटरी क्लब वेस्टच्या अध्यक्ष भाग्यश्री भिडे,संयुक्त प्रकल्पाचे डायरेक्टर चारू श्रोत्री,आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष,पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना रविंद्र बिनवडे यांनी सरकारी यंत्रणा सर्वच बाबींना पुरेशी पडू शकत नाही,या कार्यात सामाजिक संस्थांनी हातभार लावणे व लोकसहभाग महत्वाचा असे संगितले.डॉ.शैलेश पालेकर यांनी बोलतांना नवजात बालकाचे तापमान १ अंश जरी कमी झाले तरी त्याला १० टक्के जास्त ऑक्सीजन जास्त लागतो ते न झाल्यास बाळाचे प्राण धोक्यात येतात,यासाठी इंन्कीब्युटर्स महत्वाचे साधन आहे असे प्रतिपादन केले.मधुरा विप्र यांनी सूत्रसंचालन केले.
छायाचित्र :डावीकडून मधुरा विप्र,शैलेश पालकर,रविंद्र बिनवडे,आशिष भारती,चारू श्रोत्री,भाग्यश्री भिडे.