रोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशन येथील दिव्यांग अथवा रुग्ण प्रवाशी सेवेसाठी ३ व्हिल चेअर प्रदान करण्यात आल्या. या कार्यक्रम प्रसंगी स्टेशन डायरेक्टर एस.सी.जैन, रोटरी क्लब फॉरच्यूनचे संस्थापक अध्यक्ष दीपक तोष्णीवाल, रोटरी क्लब फॉरच्यूनचे अध्यक्ष असित शहा, भरत गुरव, हेमंत रसाळ आदी मान्यवरांच्या बरोबरच तेथील लायसेंसी पोर्टर- कुली उपस्थित होते.एस.सी.जैन यांनी पुणे रेल्वे स्टेशन येथून रोज सुमारे १ लाख पेक्षा अधिक प्रवाशांचे येणे जाणे होत असते असे संगितले. दीपक तोष्णीवाल यांनी दिव्यांग व रुग्ण प्रवाशांना सुलभ सेवा मिळावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे संगितले.
छायाचित्र : एस.सी जैन,दीपक तोष्णीवाल व कुली यांचे समूह चित्र.