गदिमांच्या जन्मगावी रंगला पुरस्कार सोहळा

Share This News

आधुनिक वाल्मिकी गदिमा ह्यांच्या नावाने दिला जाणारा गदिमा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र्र कामगार साहित्य परिषद देत असते. ह्यासाठी राज्यभरातून दर्जेदार कवितासंग्रहतून ससर्वोत्कृष्ट कवितासंग्रहाला गदिमा साहित्य पुरस्कार दिला जातो. परिषदेचे पुरुषोत्तम सदाफुलें आणि राजेंद्र वाघ ह्यांच्या नेतृत्वामध्ये हे कार्य चालते.
ह्यावर्षीचे पुरस्कार तिघाजणांना देण्यात आले.
त्यात देवा झिंजाड, साहेबराव ठाणगे, विनायक पवार व श्रीनिवास म्हस्के ह्यांना दनेयात आले.
खासदार श्रीनिवास पाटील, श्रीपाल सबनीस, उल्हास पवार,मिलिंद जोशी, हतसेच ह्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सुदाम भोरे ह्यांच्या हस्ते सर्वांना सन्मानित केले गेले.

त्यानंतर गदिमांचे वारसदार म्हणूम निवडलेल्या कवींचे बहारदार कविसंमेलन झाले. प्रसंगी
“बाळा मला भूक नाही
असं आई जव्हार म्हणायची
आमच्या टोपल्यात तव्हा
अर्धी भाकर असायची”

ह्या देवा झिंजाड ह्यांच्या कवितेने सर्वांचे डोळे पाणावले. नारायण पुरी ह्यांच्या काटा कवितेने सगळ्यांची मने जिंकली.

ह्या प्रसंगी श्रीनिवास पाटील व सबनीस सरांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केले. उल्हास दादा पवारांनी गदिमांच्या आठवणी सांगून भूतकाळ जागा केला. सुमित्र माडगूळकर ह्यांनाही भावना मोकळ्या केल्या.