पुणे (दि.२६) “जो सामाज विकास करत असतो त्यात आपला विचार मांडण्याचे स्वातंत्र्य असते, तरुणांनी आपले विचार निर्भयपणे मांडावेत. पारतंत्र्यात असतांना लोकमान्य टिळक,गोपाळ आगरकर, स्वातंत्र्यविर सावरकर यांनी आपल्या वक्तृत्वाने समाज प्रबोधन केले होते. तरुणांनी आपले विचार मांडतांना निर्भयपणे मांडावेत असे प्रतिपादन सूर्यकांत पाठक यांनी केले. ते श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय आयोजित स्व.गोपाळ गणेश आगरकर स्मृती करंडक वादविवाद स्पर्धा उद्घाटनप्रसंगी बोलत होते. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी उपाध्यक्ष अॅड.अशोक पलांडे, प्राचार्या डॉ.सुनीता आढाव आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. ही राष्ट्रीय स्तरावरील आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा आहे. स्पर्धेचे हे १६ वे वर्ष असून यावर्षी सुमारे ८६ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला आहे.
छायाचित्र : उद्घाटन प्रसंगी डावीकडून सुर्यकांत पाठक, अॅड.अशोक पलांडे,प्राचार्या डॉ.सुनीता आढाव