“नव्या शैक्षणिक धोरणामुळे आपल्या आवडीच्या विषयात उच्च शिक्षण घेणे सहजसुलभ होणार आहे.”- डॉ.देविदास गोल्हर.

Share This News

पुणे (दि.१५) “ या पूर्वीच्या साचेबद्ध व परीक्षकेंद्री शैक्षणिक धोरणा ऐवजी नव्या शैक्षणिक धोरणात झालेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रांत उच्च शिक्षण घेता येईल, कारण या पद्धतीत एका विद्याशाखेचा अभ्यास करत असतांना दुसऱ्या ही आवडीच्या विद्याशाखेतील काही विषय निवडता येतील.” असे प्रतिपादन डॉ.देविदास गोल्हर(सदस्य NEP टास्कफोर्स) यांनी केले. डिइएस सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात आयोजित स्कूल कनेक्ट(NEP) या एकदिवसीय कार्यशाळेत विद्यार्थांना ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या लिगल एड रूम येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन अॅड.अशोक पलांडे, प्राचार्या डॉ.सुनिता आढाव व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. डॉ सुनिता आढाव यांनी नव्या शैक्षणिक धोरणाची माहिती व त्याचे फायदे विध्यार्थ्यांना माहित व्हावेत या हेतूने या कार्याशाळेचे आयोजन केल्याचे प्रतिपादन केले.
छायाचित्र : मार्गदर्शन करतांना डॉ.देविदास गोल्हर.