भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन सवाई गंधर्व महोत्सवास 50% उपस्थिती सह परवानगी द्यावी तसेच शनिवारवाडा देखील कार्यक्रमासाठी खुला करावी अशी मागणी केली.यावेळी सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, महोत्सवाचे संयोजक श्रीनिवास भीमसेन जोशी व भाजपा प्रवक्ता संदीप खर्डेकर उपस्थित होते.या दोन्ही विषयांवर सकारात्मकता चर्चा झाली. ओमीक्रोन च्या प्रादुर्भावामुळे नव्याने बंधने आली असली तरी नियम बदलत असतात, मात्र सध्या चा ओमीक्रोन चा धोका बघता 25% उपस्थिती चे बंधन आहे, पण तरीही महोत्सव चांगल्या वातावरणात आणि नियमांच्या अधीन राहून रसिकांच्या उपस्थितीत यशस्वी पणे पार पडेल असा विश्वास आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.तसेच एल्गार परिषदेनंतर कोणतेही संयुक्तिक कारण नसताना शनिवारवाड्यावर सरसकट कार्यक्रम करण्यास परवानगी नाकारली जाते हे अयोग्य असल्याने त्याबाबत ही निर्णय घ्यावा असे आग्रही मत आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडले. त्याबाबत ही आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली व अराजकीय कार्यक्रमाना परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्याचे मान्य केले.