*सर्कस जगावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – आ.चंद्रकांतदादा पाटील*.

Share This News

सर्कस हे मनोरंजनाचे अत्यंत प्रभावी माध्यम असून सर्कस ची कला आणि त्यातील कलाकार जगले पाहिजेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. पूर्वीच्या काळी सर्कस मध्ये विविध प्राण्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे खेळ सादर केले जायचे – वाघ,सिंह, गेंडा यासह विविध हिंस्त्र प्राणी रिंगमास्टर च्या तालावर खेळ सादर करायचे मात्र आता प्राण्यांवर बंदी असून कलाकार आपली कला सादर करतात, विदूषक नागरिकांना हसवून त्यांच्या दैनंदिन जीवनातील ताण हलका करतात, त्यामुळे मी यासाठी सर्वतोपरी मदत करणार असून, आत्ता भरलेली सर्कस ही गरजुना मोफत दाखवावी यासाठी काही तिकिटे खरेदी करणार असल्याची घोषणा ही चंद्रकांतदादांनी केली. यावेळी खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, भाजप चे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे, नगरसेवक हरिदास चरवड, सागर भूमकर,आनंद दांगट, अभिजीत धावड़े,मंगेश खराडे,वैभव मुरकुटे, सर्कस चे व्यवस्थापक राजू आयसॅक इ मान्यवर उपस्थित होते.चंद्रकांतदादा पाटील यांनी कोरोनाच्या संकटात, लॉकडाउन च्या गंभीर परिस्थितीत विविध सोसायटीत व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सर्कस चा उपक्रम राबविला. भाजप च्या उद्योग आघाडीच्या माध्यमातून दादांनी सर्व कलाकारांना मदत केली असे संदीप खर्डेकर यांनी सांगितले. तसेच खर्डेकर यांनी रॅम्बो सर्कस शी असलेल्या 25 वर्षांच्या नात्याच्या आठवणींना उजाळा दिला व 1994/95 साली पुण्यात सर्कस आली की शब्दश: नागरिकांची अलोट गर्दी होत असे व हाऊसफुल चा बोर्ड लागत असे असे सांगितले. तसेच दिलीपभाई, जॉन मॅथयूज, ओमप्रकाश कोहली या मंडळींनी सर्कस उर्जीतावस्थेत आणली असेही संदीप खर्डेकर म्हणाले. आ. भीमराव तापकीर यांनी देखील बालपणी च्या सर्कस च्या आठवणी सांगितल्या तसेच चंद्रकांतदादा आदेश देतील त्याप्रमाणे सर्कस ला मदत करू असे वचन दिले.संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन, सचिन मोरे यांनी स्वागत तर राजूभाई आयसॅक यांनी उपस्थितांचे सत्कार व आभार प्रदर्शन केले.