*ब्रेव्ह सोसायटी इंडिया च्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार आणि कोरोना योद्धा सन्मान*

Share This News

दिनांक 18 डिसेंबर औरंगाबाद ब्रेव्ह सोसायटी इंडिया च्या वतीने दिले जाणारा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून आज मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृह औरंगाबाद आयोजित करण्यात आला होता.
या पुरस्कार सोहळ्यासाठी रासेयो संचालक डॉ टी आर पाटील, शिक्षण मंत्रालय उन्नत भारत अभियान च्या प्रकल्प अधिकारी डॉ आम्रपाली त्रिभुवन, जिल्हा परिषद सदस्य श्री रमेश पवार, गोरख चव्हाण पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्ष औरंगाबाद शहर आणि ब्रेव्हज सोसायटी इंडियाचे संस्थापक प्रा. जीवन गाडे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. देशभरातून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यात डॉ. टी आर पाटील (समाजरत्न) डॉ. चेतना सोनकांबळे (आदर्श शिक्षक ,संशोधन रत्न) डॉ. आम्रपाली त्रिभुवन (इन्स्पायरिंग यंग वुमन), डॉ. संघर्ष सावळे (संशोधन रत्न),
डॉ. राजेश गायकवाड (संशोधन रत्न), श्री सोमनाथ स्वभावाने -जूनियर चार्ली (कलारत्न), श्री प्रसाद पाटील (युवारत्न), स्वाती भालशंकर शिवम महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बीड(एन जी ओ एक्सलन्स),श्री सचिन ढोले (युवारत्न),डॉ. ज्योती मगरे (संशोधन रत्न), हरबीर सिंग (कृषिरत्न) श्री विद्यानंद यादव (क्रीडा रत्न), यांना ब्रेव्ह सोसायटी इंडियाच्या राष्ट्रीय पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आले.
यावेळी ब्रेव्ह सोसायटी इंडिया च्या वतीने कोरोना महाभारी च्या काळात कार्य करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी पोलीस कर्मचारी पत्रकार राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक या कोरोना योद्धांचा सन्मान देखील करण्यात आला.
तसेच ब्रेव्ह फायर अँड सेफ्टी अकॅडमीच्या उन्नत भारत अभियान कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या पुरस्कार सोहळा यशस्वी करण्याकरिता आसिफ शेख, श्री लक्ष्मीकांत कुलकर्णी, वेदांत डिके, रोहिणी मनवर यांनी प्रयत्न केले.