पुणेः- कोविड 19 मुळे गंभीर झालेली परिस्थिती आणि राज्यात झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी सामजिक जबाबदारी आणि उत्तरदायीत्वाच्या भावनेतून पुणे साऊंड इलेक्ट्रीकल्स जनरेटर इव्हेंट इक्विपमेंट्स वेंडर असोसिएशन पुणे, मंडप असोसिएशन, पुणे कॅटरिंग असोसिएशन, ऑल आर्टिस्ट फौंडेशन आदी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आणि दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सहकार्याने आज रक्तदान यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे साऊंड इलेक्ट्रीकल्स जनरेटर इव्हेंट इक्विपमेंट्स वेंडर असोसिएशनच्या पुढाकारातून पुण्यातील डिपी रोड येथील सृष्टी लान्स येथे या वेळेत रक्तदान यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.
आज आयोजीत या रक्तदान शिबिरात 135 बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले.
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संयोगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संकलीत झालेल्या रक्त पिशव्या दिनानाथ रुग्णालयाच्या रक्त पेढीकडे सुपुर्द करण्यात आल्या.
पुणे साऊंड इलेक्ट्रीकल्स जनरेटर इव्हेंट इक्विपमेंट्स वेंडर असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमझानी, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, सभासद शिरीष पाठक, सोमनाथ धेंडे, उदय इनामके, मेहबूब खान,
ऑल आर्टीस्ट फाउंडेशन च्या वतीने योगेश सुपेकर, पप्पू बंड, सोमनाथ फाटके, बबलू खेडकर, संतोष पवार तर मंडप असोसिएशनचे अध्यक्ष सचिन भापकर, नितीन घाडवे, रवींद्र गायकवाड, अनंत खडके, तर पुणे केटरींग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बन्सी, विजय मिश्रा, अण्णा कुदळे आदींनी या रक्तदान यज्ञात प्रत्यक्ष रक्तदान करून शिबीराच्या यशस्वितेसाठी विशेष मेहनत घेतली.