*एकूण 21115 कार्यकर्त्यांकडून 123343 घरात संपर्क – शहराध्यक्ष जगदीश मुळीक* *अटलशक्ती महासंपर्क अभियानास अपेक्षेपेक्षा जास्त यश – राजेश पांडे* *प्राथमिक अंदाजानुसार एकूण 493372 नागरिकांपर्यंत संपर्क आणि संवाद*

Share This News

आज पुणे शहरातील अटलशक्ती महासंपर्क अभियानात शहरातील एकूण 2854 बूथ पैकी प्रत्यक्ष 2649 बूथ वर संपर्क झाला,या सम्पर्क अभियानात 21115 कार्यकर्ते सहभागी झाले व त्यांनी तब्ब्ल 123343 ( एक लाख तेवीस हजार तीनशे त्रेचाळीस ) घरांपर्यंत संपर्क केला असल्याची प्राथमिक आकडेवारी उपलब्ध झाली असून अजूनही काही भागातील आकडेवारी चे संकलन सुरु असल्याचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक व संघटन सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले.*हर घर मोदी* हा संकल्प घेऊन पक्षाच्या बूथ समितीतील कार्यकर्ते सकाळी 8 वाजताच बाहेर पडले व त्यांच्या यादीतील सर्व घरात संपर्क करून कुटुंबाशी संवाद साधला असेही शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.
कोणतीही निवडणूक नसताना कार्यकर्ता घरी येतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार च्या लोकोपयोगी योजनांची माहिती पुस्तिका देतो याचे नागरिकांना नवल वाटले व त्यांनी घरी येणाऱ्या कार्यकर्त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले असे ह्या अभियानाचे प्रमुख पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी सांगितले.माजी पंतप्रधान भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अपेक्षित असलेले कार्य यशस्वी करून आज त्यांच्या जयंती दिनी त्यांना समर्पक अभिवादन केले गेले अशी भावना व्यक्त करताना, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील,केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार,खासदार गिरीश बापट,आमदार माधुरीताई मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. मुक्ता टिळक, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. सुनील कांबळे, महापौर मुरलीधर मोहोळ, सर्व नगरसेवक, शहर पदाधिकारी ते शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि बूथ समिती सदस्यांनी आजचे अभियान यशस्वी केल्याचे ही राजेश पांडे म्हणाले. भाजप चा कार्यकर्ता हा पक्षाप्रति समर्पित कार्यकर्ता असून हीच पक्षाची ताकत असल्याचे ही राजेश पांडे यांनी स्पष्ट केले.आज एका दिवसात झालेला हा बहुधा सर्वात मोठा जनसंपर्क अभियान असावा, ज्या माध्यमातून शहरातील कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, व्यवसायिक अश्या सर्व क्षेत्रातील नागरिकांपासून सामान्य माणसापर्यंत भाजपचा कार्यकर्ता पोहोचला आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेल्या पक्ष संघटनेप्रतीचे आपले कर्तव्य पूर्ण करता झाला असे ही ते म्हणाले.