आज संपूर्ण पुणे शहरात तीस हजारापेक्षा जास्त कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून अटलशक्ती महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून दीड लाख घरात संपर्क व संवाद साधत आहेत. या माध्यमातून *हर घर मोदी* ह्या संकल्पाची पूर्तता होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या सर्व योजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 12 येथे महासंपर्क अभियानाचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी श्री. मुकेश काळे व श्री.दादासाहेब कोरेकर यांच्या घरी त्यांनी भेट दिली व त्यानंतर 5 घरी भेट देऊन अटलशक्ती महासंपर्क अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला.त्यांच्या समवेत शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर,कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,प्रभाग अध्यक्ष अमित तोरडमल,शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नील राजीवडे,बूथ प्रमुख ओम धावडे, रणजित हगवणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.या अभियानाचे प्रमुख संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे म्हणाले ” काल ऑडिओ कॉन्फरेन्स कॉल मध्ये शहरातील आठ मतदारसंघातील तब्ब्ल 49000 कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे आज एका दिवसातील नागरी संपर्काचे उच्चांक स्थापित होईल अशीच चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार च्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचव्यात व शेवटच्या व्यक्ती ला त्याचा लाभ घेता यावा हा उद्देश्य असल्याचे ही श्री. राजेश पांडे म्हणाले. सोशल मीडियाच्या प्रभावाच्या काळात आणि व्यक्तिगत संपर्क खूप कमी झाला असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधावा हे भाजप सारख्या कार्यकर्ताधिष्ठित ( cadre base ) असलेल्या पक्षातच शक्य आहे असे मत प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.