‘बँकिंग अँड फायनान्स ‘ विषयावरील राष्ट्रीय परिषदेस प्रतिसाद

Share This News

पुणे :

भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी )आयोजित ‘बँकिंग अँड फायनान्स’ विषयावरील राष्ट्रीय परिषदेस शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला. ‘मनी रोलर’चे सहसंस्थापक जनक शाह,येस सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड चे कार्यकारी संचालक अंशू अरझारे या तज्ञांनीं मार्गदर्शन केले. भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि ‘आयएमईडी’ चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर अध्यक्षस्थानी होते.१६ एप्रिल २०२१ रोजी ही ऑनलाईन राष्ट्रीय परिषद पार पडली.संशोधक,प्राध्यापक तसेच एमबीए आणि बीबीए अभ्यासक्रमाच्या २४८ विद्यार्थ्यांनी परिषदेत सहभाग घेतला.

अंशू अरझारे म्हणाले,’भारताच्या अर्थ विषयक बाजारपेठेत वाढीच्या आणि प्रगतीच्या अनेक संधी आहेत.त्यासाठी सतत बदलणाऱ्या गुंतवणूक परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे.’जनक शहा म्हणाले,’अर्थविषयक जग हे डिजिटल होत चालले आहे. त्यामुळे आर्थिक क्षेत्रात डेटा सायन्स,डेटा अनॅलिक्टिसचा अभ्यास करावा.’सर्व प्रकारच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी आयएमईडी मध्ये करून घेतली जात असून नव्या आव्हानांना तोंड देणारे नेतृत्व येथील विद्यार्थ्यांमधून घडेल’असा आशावाद डॉ सचिन वेर्णेकर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.