विवाह समारंभात करण्यात येणारे सत्कार सोहळे बंद करून शाळांच्या विकासासाठी मदत करा, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रसिध्द प्रवचनकार श्री नामदेव महाराज देशमुख(इंदुरीकर)यांनी नारायण पेठ येथे केले. महाशिवरात्र उत्सव समिती ट्रस्ट व भारत मित्र मंडळातर्फे नारायण पेठेत मोदी गणपती जवळ शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्री महोत्सवाचे उदघाटन श्री इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. हा महोत्सव दि १ मार्चपर्यंत चालणार आहे. उदघाटन समारंभात ट्रस्ट चे अध्यक्ष श्री बाळासाहेब दाभेकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या हस्ते श्री इंदुरीकर महाराज व प्रसिध्द शिल्पकार भगवान रामपुरे यांचा शिवशक्ती पुरस्कार देऊन खास सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे याप्रसंगी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक राजेश येणपुरे , निरंजन दाभेकर, काँग्रेसचे नेते संजय बालगुडे, संजय उभे, अनिल येणपुरे , आदी मान्यवर उपस्थित होते— याप्रसंगी बोलताना श्री इंदुरीकर महाराज म्हणाले की, विवाह समारंभात सत्कार सोहळा करून आपण अनावश्यक खर्च करतो त्याऐवजी हा खर्च टाळून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधा साठी हा पैसा खर्च करावा त्यामुळे विद्यार्थ्यांना चा विकास होण्यास मदत होणार आहे ते पुढे म्हणाले की, कुटुंबातील माणसांना सांभाळणे हाच खरा माणुसकीचा धर्म आहे माणसाने हसत राहून सकारात्मक विचार करावेत — प्रास्ताविक श्री अंकुश काकडे यांनी तर निरंजन दाभेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले अनिल येणपुरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
छायाचित्र : प्रवचन करताना इंदुरीकर महाराज.