महिला ब्राह्मण उद्योजिकांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.

Share This News

ब्राह्मणबिझनेस नेटवर्क ग्लोबल संस्थेच्या महिला उद्योजक आघाडीची एक दिवसीय कार्यशाळा सेनेट सेंटर डिपीरोड पटवर्धन बाग येथे पार पडली. कार्यशाळेचे अभिनव प्रकारे सोलर समईने दिप प्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या कार्यक्रम प्रसंगी ब्राह्मण बिझनेस ग्लोबलच्या महिला विभाग अध्यक्ष शीतल अर्जुनवाडकर,सचिव स्वेता ईनामदार,सहसचिव श्रेया कुलकर्णी,पुणे विभाग प्रमुख अनुजा काळे, आदि मान्यवरांच्या बरोबरच ब्राहमण महिला उद्योजिका मोठ्या संखेने उपस्थित होत्या.प्रमुख पाहुण्या डॉ.गौरी कानिटकर(अनुरूप विवाह संस्था)अनुराधा तांबोळकर(फूड ब्लॉगर,)जाई देशपांडे(अवजड वाहतूक उद्योग) होत्या. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना अनुरूप विवाह संस्थेच्या गौरी कानिटकर यांनी उद्योग करताना भावनांची हाताळणी कशी करावी,कौटुंबिक मूल्ये यांबाबत मार्गदर्शन केले. अनुराधा तांबोळकर यांनी  प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून वय हा फक्त एक आकडा असतो, कोणत्याही वयात उद्योग व्यवसाय करता येतो,तसेच नव्या पिढीला पडलेल्या प्रश्नांची विविध उदाहरणे देत मार्गदर्शन केले.या कार्यशाळा स्थळी या उद्योजिकांनी बनवलेल्या उत्पादनाचे प्रदर्शनही केले होते. शीतल अर्जुनवाडकर यांनी महिलांनी उद्योगात यावे तसेच नवी उद्योजक पिढी निर्माण करावी असे प्रतिपादन केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुणे विभागाच्या सर्वांनी विशेष परिश्रम केले.