जातवैधता प्रमाणपत्राचा बहाणा करून एस.टी. प्रवर्गातील गुणी अध्यापक / प्र. प्राचार्य असणा-या श्री. राहुल बळवंत (कोळी) यांचे विरूध्द षडयंत्र रचुन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न.

Share This News

सन २००६ चे जे तथाकथित जातवैधता प्रमाणपत्र श्री. राहुल बळवंत (कोळी) यांनी दाखल केल्याचा कोणताच पुरावा नसतानाही देखील तथाकथित जातवैधता प्रमाणपत्राचा बहाणा करून श्री. राहुल बळवंत (कोळी) यांना अडकवण्याचे षडयंत्र रचले जात आहे असे समजते. त्या बाबत विस्तृत माहिती अशी आहे की, भारतीय कला प्रसारिणी सभा हा शैक्षणिक न्यास असुन त्या न्यासाकडुन चालविल्या जाणा-या अभिनव कला महाविद्यालयातील कर्मचारी हे न्यासाचे कर्मचारी आहेत. असे असतानाही देखील सन २०२२ मध्ये कला संचालनालय मुंबई यांनी श्री. राहुल बळवंत (कोळी) यांना पत्र लिहुन एका तथाकथित दिनांक २९/०९/२००६ रोजीच्या जात वैधता प्रमाणपत्रा बदद्ल प्रश्न उपस्थित केला. त्यावर भारतीय कला प्रसारिणी सभा संस्थेने कला संचालकास पत्र लिहिले व कळविले की, आमच्या संस्थेकडुन चालविल्या जाणा-या महाविद्यालयातील कर्मचारी हे संस्थेचे कर्मचारी आहेत. त्यांच्या कोणत्याही प्रकरणात योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार हा संस्थेचा आहे. त्यामध्ये कलासंचालनालयाने ढवळाढवळ करू नये.

त्यानंतर श्री. राहुल बळवंत (कोळी) यांचे संदर्भात भारतीय कला प्रसारिणी सभा न्यासाने त्रिसदस्यी समिती स्थापन केली. सदरील समिती समोर श्री. राहुल बळवंत (कोळी) यांना दिनांक ०७/०७/२०२२ रोजी उपस्थित राहुन म्हणणे मांडण्यास सांगितले. त्यानुसार श्री. राहुल बळवंत (कोळी) यांनी त्याचे म्हणणे मांडले. चौकशी समितीने श्री. राहुल बळवंत (कोळी) यांची सर्व्हिस फाईल देखील पडताळली व त्यावर विस्तृत अहवाल निष्कर्ष व संदर्भा सकट तयार करण्यात आला. त्यामध्ये एक महत्वाची बाब पुढे आली म्हणजे दिनांक २९/०९/२००६ रोजीचे तथाकथित जात वैधता प्रमाणपत्र श्री. राहुल बळवंत (कोळी) यांनीच दाखल केले होते असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही आणि मुळात ज्या तथाकथित जात वैधता प्रमाणपत्राची मुळ प्रत निदर्शनास येत नाही तसेच ते श्री. राहुल बळवंत (कोळी) यांनीच दाखल केल्याचा पुरावा अस्तित्वात नाही, त्या प्रकरणी श्री. राहुल बळवंत (कोळी) दोषी आढळत नाहीत हे स्पष्ट आहे. असे असतानाही एस.टी. प्रवर्गातील कर्मचा- यावर कोणतीही कारवाई करणे हे अन्यायकारक ठरेल.

संस्थेचा चौकशी समिती अहवाल अतिशय सुस्पष्ट असतानाही देखील एक राजकीय महिला मनिषा धारणे व अभिनव कला महाविद्यालयामध्ये कामास असणारा व ज्याची शिक्षक म्हणुन कारकीर्द वादग्रस्त असणारा राजेंद्र ढवळे या दोघांनी मिळून सतत कलासंचालनालय वर श्री. राहुल बळवंत (कोळी) यांचे विरूध्द सन २००६ च्या जात वैधता प्रमाणपत्राचा बहाणा करून कारवाई करण्याचा तगादा लावला आहे. या षडयंत्रास पुर्णत्वास नेण्याकरीता मनिषा धारणे व राजेंद्र ढवळेने कलासंचालक राजीव मिश्रा यांना हाताशी धरले आहे असे समजते. मनिषा धारणे चे राजीव मिश्रा बरोबर घनिष्ठ संबंध आहेत. त्या महिला मिश्रांच्या कार्यालयात देखील नेहमी पहावयास मिळतात. अशी माहिती मिळाली आहे. खरतर मनिषा धारणे या राजकीय महिलेवर यापुर्वी संस्थेने दोन फौजदारी केस दाखल केल्या आहेत. तर राजेंद्र ढवळे यांचे विरूध्द भा.द.वि. ३५४ प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.

राजेंद्र ढवळे हा कर्मचारी एस.सी. प्रवर्गातील आहे. व तो सन २००५ पासुन एस.टी. प्रवर्गातुन पदोन्नती मागत आहे. सन २००६ साली श्री. राहुल बळवंत (कोळी) महाविद्यालयाचे सेवेत रूजु झाल्यापासुन इतर कोणत्याही प्रवर्गातील कर्मचा-यांस एस.टी. प्रवर्गातुन पदोन्नती देण्याचा मार्ग बंद झाला होता. म्हणजेच श्री. राहुल बळवंत (कोळी) हे राजेंद्र ढवळेकरीता अडचणीचा विषय आहेत. म्हणुन श्री. राहुल बळवंत (कोळी) यांना येनकेन प्रकारे खोट्या प्रकरणात अडकवुन त्यांची नोकरी घालवुन एस.टी. प्रवर्गातुन पदोन्नती मिळवण्याकरीता राजेंद्र ढवळे, मनिषा धारणे या राजकीय महिलेस हाताशी धरून षडयंत्र रचुन हे सर्व करत आहे. अशी माहिती मिळाली आहे. दिनांक २९/०९/२००६ चे तथाकथित जातवैधता प्रमाणपत्र राहुल बळवंत (कोळी) यांना अडकवण्याकरीता मनिषा धारणे व राजेंद्र ढवळे यांनीच बोगस तयार केल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

एस.टी. प्रवर्गातील कर्मचा-यावर कोणताही अन्याय होवु नये याकरीता महादेव कोळी समाज श्री. राहुल बळवंत (कोळी) यांचे पाठिशी भक्कमपणे उभा आहे. अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणात कलासंचालनालयाने मनिषा धारणे व राजेंद्र ढवळे यांच्या दबावास बळी न पडता कायदेशीर स्थितीस अनुसरूनच निर्णय घ्यावेत ही अपेक्षा आहे.