बा.ग केसकर लिखित व ग्रंथाली मुंबई प्रकाशित खळबळ जनक राजकीय कादंबरी “राजा कालस्य कारणम” चे प्रकाशन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाङगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी लेखक बा.ग केसकर, प्रसिद्ध अभिनेते उद्य लागू, प्रसिद्ध पत्रकार मनोहर सप्रे, योगिराज पतसंस्था बाणेरचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, ग्रंथाली प्रकाशन मुंबईच्या धनश्री धारप, दत्तात्रय तापकीर, हेमंत केसकर. आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना सुधीर गाङगीळ यांनी सत्ताधार्यांचे निर्णय जनतेला भोगावे लागतात, चांगल्या आर्थिक स्वप्नाची लावलेली वाट यात चित्रित आहे. ग्रामीण जीवनाचे यथार्थ दर्शन आहे असे प्रतिपादन केले. लेखक बा.ग.केसकर यांनी महाराष्ट्रात राहणार्यांनी मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे मराठीत बोलले पाहिजे असे संगितले. ग्रंथाली प्रकाशित “राजा कालस्य करणम”पुस्तकास २०८ पाने असून किंमत २५० रु आहे.
छायाचित्र :डावीकडून धनश्री धारप, सुधीर गाङगीळ, बा.ग.केसकर, उदय लागू, मनोहर सप्रे, दत्तात्रय तापकीर