आरोग्यम: योग आश्रमाचे उदघाटन समारंभात दिव्यांग मुलं मुलींसोबत त्यांचा पालकांचा सहभाग. मार्गदर्शक डॉ. हेमंत खेडेकर गुरुजी, इस्कॉन पॅट्रोन रूरल स्पेसिऍलिस्ट आर्किटेक्ट मंदार क्षीरसागर, आयोजक सिद्धेश तोरडमल, तेजस संभूस आणि नितेश धावंडे यांच्या प्रयत्नाला यश मिळाले. ग्रामस्थांनी मुला मुलींचे शाल, श्रीफळ आणि टोपी देऊन सत्कार केले व आश्रमाच्या उद्धघाटनासाठी शुभेच्छा दिल्या. दिव्यांग मुले मुलीने बनविलेले वस्तू आश्रमातर्फे गावकऱ्यांना भेट म्हणून देण्यात आले. गावातून मंगेश मरे, पांडू मरे, दिनेश मरे, भरत वाघ, प्रकाश वाघ, साधू रसाळ, दत्तू मरे व इतर उपस्थित होते. ग्रामस्थ व त्यांच्या परिवाराने आश्रमाच्या उदघाटनात आनंदाने सहभाग घेतला व गावच्या मंदिरात खूप आनंदाने भोजन कार्यक्रम व वाद्य कार्यक्रम साजरा केला. गावातल्या महिलांच्या वतीने सर्वांना पिठलं भाकर, वांगे असे चविष्ट जेवण देण्यात आले. उत्साही व आनंदी प्रतिसादासाठी आयोजग सिद्धेश तोरडमल आणि तेजस संभूस यांच्या परिवाराने गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले.