राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या औचित्याने हातमागावरील अप्रतिम कलाकृतींचे प्रदर्शन “धागा हॅन्डलूम महोत्सवाचे” उदघाटन अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले होते. या महोत्सवाचे आयोजन प्रा. मेधा कुलकर्णी यांनी केले होते.
या प्रसंगी उषा काकडे, मुक्ता टिळक, ध्रुवकुमार बनसोडे ( जिल्हा उद्योग प्रशासकीय अधिकारी ) उमाताई खापरे, डॉ. आरती निमकर, स्वरादा बापट, अंकिता हर्षवर्धन पाटील, सुहासिनी मेहंदळे,, नगरसेवक जयंत भावे , ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, वृषाली चौधरी, शैला मोळक, कलाक्षेत्रमचे सागर पासकंठी, घे भरारीचे संयोजक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अमृता फडणवीस बोलताना म्हणाल्या की, “स्त्री सक्षमीकरणासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे. आपला देश हा शेतीप्रधान आहे आणि आणि त्या नंतर जर कोणता उद्योग पुढे आहे तो म्हणजे हातमाग व्यवसाय होय. महाराष्ट्राची शान असणारी आपली पैठणी जगभरात प्रसिद्ध आहे आणि ही पैठणी जगभरातील अनेक स्त्रीया परिधान करतात. “पुढे त्या म्हणाल्या की,” हातमागावरील कारागिरांनी घडवलेल्या अप्रतिम कलाकुसर या महोत्सवात उपलब्ध आहेत. हातमाग व्यवसायात महिलांचा सहभाग मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी हातमाग व्यवसायाला प्राधान्य द्यायला हवे.”
प्रा. मेधा कुलकर्णी या प्रसंगी म्हणाल्या,
” ७ ऑगस्टचे औचित्य साधून आम्ही धागा हॅन्डलूम महोत्सवाचे आयोजन केले आहे. हातमागावरील घडवलेल्या अप्रतिम कलाकुसरीच्या या महोत्सवात सिल्क आणि कॉटनच्या साड्या, कुर्ते, पर्स, जॅकेट, विविध प्रकारची खेळणी उपलब्ध आहेत”. त्या पुढे म्हणाल्या, ” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विणकरांसाठी विविध योजना तयार केल्या आहेत. या योजना जास्तीत जास्त विणकरां पर्यंत पोहोचवण्यासाठी आगामी काळात काम केले जाईल. “कार्यक्रमाचे आयोजन प्रा. मेधा कुलकर्णी उपाध्यक्ष राष्ट्रीय महिला मोर्चा भाजपा व मा आमदार यांनी केले होते तर स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.