पुणे (दि.७) अल खैर या सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन संपन्न झाले. वेलकम हॉल शेजारी,कोंढवा पुणे येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अल खैर वेल्फेअर फौंडेशनचे अध्यक्ष अब्दुल गफ्फार शेख, इनामदार सर, दिलीप भिकुले, विजय भोसले, समीर शेख, अझर शेख, अफसर शेख, विकास भांबुरे आदी मान्यवर उपस्थित होते. ही संस्था पुणे शहरात शैक्षणिक,सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. गरीब ,गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करून उच्चशिक्षणासाठी पाठबळ देण्याचे कार्य करते. या नवीन कार्यालयाने संस्थेचे कार्यक्षेत्र आणखी विस्तारणार असून अधिक प्रभावीपणे समाजसेवा करता येईल असे यावेळी नमूद करण्यात आले.
छायाचित्र : उद्घाटन प्रसंगी मान्यवर.