*अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे* युवक शाखे तर्फे गरजु रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिंलेडर देण्यात येत आहे असे संघटनेचे युवक अध्यक्ष युवराज दिसले यांनी सांगितले
निसर्गाने ऑक्सिजन फुकट दिला पण आपण त्याला जपलं नाही आणि आज सर्वांवर ती विकत घेण्याची वेळ आलीय
भारत हा ऑक्सिजन निर्मितीमधे जगात पहिल्या क्रमांकाचा देश असून देखील आज भारतातील लोकांना ऑक्सिजन विना प्राण सोडावे लागत आहे.
आजच्या या भयाण परिस्थितीत सर्व सामन्य जनता हतबल होऊन आश्वासक नजरेने प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा करतेय . आमचं नेतृत्व भक्कम आहे म्हणूनच जबाबदारीच भान ठेवून सध्याच्या कोविड -१९ सारख्या महामारीत ऑक्सिजन चा तुटवडा जाणवत आहे अशा परिस्थितीत गरजूंसाठी तसेच हॉस्पिटल मधील *करोना पेशंट साठी ऑक्सिजन मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.*
एखाद्या व्यक्तीला कोविड ची लक्षणे दिसून आल्यावर त्याने कोविड टेस्ट केली. पण रिपोर्ट यायला दोन ते चार दिवस लागतात , तो पर्यंत त्यांचा ऑक्सिजन कमी झालेला असतो , त्यांना ऑक्सिजन बेडची गरज भासते, हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होईपर्यंत अनेक नगरसेवक आमदार खासदार आणि इतर लोकांकडून तो मिळवण्याचा प्रयत्न केला जातो पण त्यांना तो मिळत नाही. म्हणूनच या पुरवलेल्या ऑक्सिजन सिलेंडरमुळे रुग्णाच्या आयुष्यावर आलेला धोका टळू शकतो अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहराने एक हात मदतीचा , आपली मदत कोणाचा तरी जीव वाचवू शकते असे उद्दीष्ट ठेवुन
10 लिटर कॅपसीटी ऑक्सिजन जो
7 ते 8 तास चालू शकतो असा मोफत वाटत आहे
हा उपक्रम राबविण्यासाठि निलेश सांगळे, राकेश गायकवाड,सौरभ शिंदे, सचिन वडघुले, किशोर बाबर व इतर सर्व पदाधिकारी सहकार्य करीत आहे
गरजु व्यक्तीनी खालील नंबर वर संपर्क करावा-
9850980044, 7447867979,