*आदित्यजी ठाकरे झाले कसबा गणपतीच्या पालखीचे मानकरी; पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला केला प्रारंभ* विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे, आ. सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीला उत्साहात सुरुवात; शिवसैनिक आणि जनतेत उत्साहाचे उधाण

Share This News

पुणे, ता. ९ : महाराष्ट्राचे माजी पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री तसेच युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांनी आज पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्रींच्या पालखीला काहीवेळ खांदा देऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला.  यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपनेत्या आणि विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे, विधान परिषद सदस्य आणि पुणे संपर्क प्रमुख सचिन अहिर, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, नगरसेवक विशाल धनवडे, प्रशांत बधे, बाळासाहेब भांडे, महीला आघाडी पदाधिकारी अनिता परदेशी, अश्विनी शिंदे, करुणा घाडगे आदी आवर्जून उपस्थित होते.

चौकट : *आज आदित्यजी, डॉ. नीलम गोऱ्हे, आ. सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन करून आरती केली. या प्रसंगी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आदित्य ठाकरे यांना आज श्रींचा प्रसाद दिला.*