युवा संगीतकार अक्षय दाभाडकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘हे आराध्य’ हे गणपती बाप्पा वरील गीत लवकरचं रसिकांच्या भेटीला येणार आहे. सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर याच्या आवाजात हे गीत स्वरबद्ध केले आहे. तर डॉ. प्रदीप कार्यकर्ते यांनी लिहलेल्या गीताचे “हे आराध्य सकल जनांच्या” “विघ्नविनाशक मोरया”….. हे बोल आहेत. अशी माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शरद दाभाडकर, सुधीर दाभाडकर व संगीत दिग्दर्शक आणि संयोजन अक्षय दाभाडकर यांनी दिली.
सदरील गीत गाताना गणरायाला स्मरून मी हे गीत गायलं असून युवा संगीतकार अक्षय सोबत काम करताना छान अनुभव होता असे स्वप्नील बांदोडकरने त्याचे मत व्यक्त केले.
गणेशोत्सवानिमित्ताचे औचित्य साधून गणेश भक्तांसाठी सदरील गीत तयार केले आहे. अक्षयला लहानपणापासून संगीताची आवड असल्याने सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित रमाकांत यांच्याकडे त्याने संगीताचे धडे घेतले आहेत. “हे आराध्या” या विघ्नहर्त्या गणपतीवर युवा वर्गाला व पारंपरिक प्रेक्षकांना आवडेल अशी ढोल ताशाच्या गजरात रचना तयार केली आहे. जी रसिकांच्या मनाचा ठाव घेईल. अक्षय दाभाडकर म्हणाला की आगामी काळात मी गजल, भावगीत आणि चित्रपटांना ही संगीत देणार आहे.