पुण्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे.ओमिक्रोनच्या संकटसाठी प्रशासन प्रशासन सज्ज हवे.मात्र त्या ऐवजी पुणे महानगर पालिका गुजरात दौर्याची तयारी करीत आहेत. आम आदमी पक्षाला मिळालेल्या माहिती नुसार या दौर्यात पुण्याचे महापौर,स्थायी समिति प्रमुख,मनपा आयुक्त,अतिरिक्त आयुक्त,मनपाच्या विविध विभागांचे प्रमुख आणि काही मोजके पत्रकार असे ३० ते ३५ जण यात सहभागी आहेत. प्रवासासाठी विमान खर्च असल्याचे समजते.महानगर पालिकेकडे तिजोरीत पुरेसे पैसे नाहीत मात्र अशा वेळी हा दौरा आणि तो ही निवडणुकीच्या तोंडावर कशासाठी त्यामुळे जनतेच्या कररूपी पैशाची उधळपट्टी करणारा दौरा रद्द करावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रवक्ता डॉ.अभिजीत मोरे,खडकवसला मतदार संघ अध्यक्ष कृष्णा गायकवाड,बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय कार्याध्यक्ष घनश्याम मारणे,पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष किरण कांबळे यांनी पुणे महानगर पालिका येथे पत्रकार परिषदेत केली.
छायाचित्र :डावीकडून किरण कांबळे,कृष्णा गायकवाड,अभिजीत मोरे,घनश्याम मारणे.