स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेल्या महापुरूषाच्या नावाची ओळख मेट्रो स्थानकाला देताना पुन्हा अवहेलना ..

Share This News

महामेट्रोरेलच्या माध्यमातून पुणे शहरात होत असलेल्या मेट्रोच्या स्थानिकांना नाव देताना आपणाकडून नेहमी इतिहासाची तोडफोड करण्याबरोबरच महापुरुषांच्या नावाचा विसर पडणे, चुकीचे नाव देणे असे प्रकार करण्यात आले आहेत. त्याबाबत शिवसेनेच्या वतीने अनेकदा निवेदन आंदोलन करण्यात आले आहे. यामधे आपला नवीन प्रताप म्हणजे महात्मा फुले मंडई असा मंडईचा नामोल्लेख असताना येथील मेट्रो स्थानकाला मंडई असे नाव देण्याचे कारण काय ? महापुरूषांचा नामोल्लेख टाळून त्यांचा अवमान करण्याचे कारण काय ? असा सवाल आम्ही आपणास समस्त पुणेकरांच्या वतीने विचारत आहोत. महात्मा फुले मंडईच्या नामोल्लेखाचा इतिहास आपणास माहिती करून देत आहोत.

आपल्या देशात इंग्रज राज्य करीत होते त्याकाळात म्हणजे 1882 सालात इंग्रजांनी मंडईचा बांधण्याचे काम चालू केले. 5 ऑक्टोबर 1886 सालात बांधकाम पूर्ण होउन मंडईला त्यावेळेच्या गव्हर्नर लाॅर्ड रे मार्केट इंडस्ट्रीयल म्युझियम असे नाव देण्यात आले. मात्र 1938 साली नगरपरिषदेत आचार्य अत्रे यांनी ठराव मांडून मान्य करून मंडईला “महात्मा फुले मंडई” असे नामकरण करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात देण्यात आलेले नाव व त्याकाळातील इतिहास पुसण्याचा काम आपण करीत आहात. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. त्वरीत यानावात बदल करण्यात यावा. आमच्या माहितीनुसार येत्या 27 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या उद्घाटना अगोदर हे नाव बदलण्यात यावे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने पुन्हा उग्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. आपण पुणे शहरात मेट्रो स्थानकाला अशी चुकीची नाव देउन वेगळा पायंडा पाडू नका. त्याची उदाहरणे खाली नमूद करीत आहोत.

छत्रपती शिवाजी नगर स्थानकाला शिवाजी नगर असा एकेरी उल्लेख केला. आरटीओ येथील स्थानका जवळील भागात छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक संस्था उभी केली. त्यांचे नाव देणे आवश्यक होते. परंतू महामेट्रोरेल प्रशासनाने या मेट्रो स्थानकाला मंगळवार पेठ नाव दिले. कसबा पेठेतील मेट्रो स्थानकाला बुधवार पेठ नाव देउन अवहेलना केली. तसेच माता रमाई आंबेडकर पुतळा येथील स्थानकाला पुतळा समितीची जागा घेऊनही येथील स्थानकाला रूबी हाॅल नाव दिले गेले. वारंवार आपणाकडून पुणे शहराचा इतिहास पुसण्याचा कार्यक्रम चालू आहे.*व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनातील सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवसेनेच्या मागणीबाबत महामेट्रोच्या स्थानक नाव समितीकडे सदर विषय ठेउन लवकरात लवकर नावातील बदलाबाबत भूमिका घेउ असे सांगितले.*

याप्रसंगी

संजय मोरे बाळासाहेब मालुसरे विशाल धनवडे
(पुणे शहरप्रमुख) (उपशहरप्रमुख) (विधानसभाप्रमुख)

 

जावेद खान, चंदन साळुंके नंदू येवले नागेश खडके
(समन्वयक) (विभाग प्रमुख) (विभाग संघटक) (प्रभाग समन्वयक)

उपविभागप्रमुख अजिंक्य पांगारे, सचिन चिंचवडे, नितीन रावळेकर, गनी पटेल, उपस्थित होते.