विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना.

Share This News

पुणे (दि.७) महाराष्ट्रातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो.राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन झाले.महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ.नीलमताईगोऱ्हे यांच्या पुण्यातील “सिल्व्हर रॉक्स)या निवासस्थानी गणरायाची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली.उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी मनोभावे गणरायाची आरती करून राज्याच्या सुखसमृद्धी व भरभराटीची कामना केली.राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार यावे. भविष्यात होणारी विधानसभा निवडणूक शांततामय मार्गाने आणि लोकशाही मजबूत करणारी असो अशी प्रार्थना डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी गणरायाकडे केली.