मी टू वुई २०३४ या सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. दीपक तोषणीवाल यांचा कोरोना महामारीच्या काळात केलेल्या सामाजिक सेवेसाठी कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित केले. महात्मा फुले सभागृह येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक प्रिया पारिख, अभिनेता सुयश टिळक, अभिनेत्री राधिका देशपांडे, देवशीष चक्रवर्ती, सोनाली गार्गी आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह व रोपटे असे पुरस्काराचे स्वरूप होते. आर.जे. बंड्या यांनी कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन केले.
छायाचित्र :डॉ दीपक तोषणीवाल यांना पुरस्कार देतांना मान्यवर.