*नवख्या कलाकारांना आकार देत भाऊरावही गुंतलेत टीडीएम चित्रपटामध्ये* *रोमँटिक आणि ऍक्शनचा तडका असलेला ‘ख्वाडा’, ‘बबन’नंतर भाऊराव कऱ्हाडेंचा ‘टीडीएम’ होणार २८ एप्रिल २०२३ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित*

Share This News

टीडीएम चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. प्रेक्षकही या ट्रेलरची उत्सुकतेने वाट पाहत होते. अशातच टीडीएमच्या ट्रेलरने हवा केली आहे. ऍक्शन रोमान्सचा भरणा असलेला हा चित्रपट गावाकडच्या मातीतला असून प्रेक्षकांच्या दिलावर राज्य करतोय. ट्रेलर पाहताच क्षणी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला ‘ख्वाडा’, ‘बबन’ यांच्या यशस्वी निर्मितीनंतर दिग्दर्शक भाऊराव कराडे यांचा ‘टीडीएम’ हा चित्रपट २८ एप्रिलला सज्ज झालाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

चित्रपटाचा ट्रेलर पाहून नवख्या कलाकारांचा भास जराही जाणवत नाही आहे. खेड्यापाड्यातील नायकाचा हजरजबाबीपणा, त्याची चालण्या बोलण्याची पद्धत हे सर्व पाहणं रंजक ठरतंय. ट्रेलरमध्ये नायक आणि नायिकेच्या रोमॅंटिक अंदाजाची झलक पाहणं भावतंय. या ट्रेलरमधील डायलॉगने तर सगळीकडे कल्लाच केलाय. ट्रेलरमध्ये पाहायला मिळालं तसं यात भाऊरावांची दमदार एन्ट्री पाहायला मिळतेय. यांत ट्रेलरमधील ‘लाथ मारशील तिकडे पाणी काढशील’ या त्याच्या डायलॉगने साऱ्यांच्या मनावर राज्य केलंय.

‘ख्वाडा’, ‘बबन’ चित्रपटाच्या यशस्वी निर्मितीनंतर भाऊराव कऱ्हाडे एक नवीन कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. अर्थात या कलाकृतीलाही प्रेक्षक, चाहते नक्कीच प्रतिसाद देतील हे ट्रेलर गाण्यांवरून कळतंय, यांत वादच नाही.

‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि ‘स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत ‘टीडीएम’ चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली आहे. या चित्रपटाच्या संवाद, पटकथा आणि कथेची जबाबदारी भिकू देवकाते, भाऊराव कऱ्हाडे, प्रो. किरण गाढवे यांनी सांभाळली आहे. तर संगीताची बाजू रोहित नागभिडे, ओंकारस्वरूप बागडे, वैभव शिरोळे यांनी पेलवली आहे. तर गायक नंदेश उमप, ओंकारस्वरूप, वैभव शिरोळे, प्रियंका बर्वे, आनंदी जोशी गाणी आपल्या सुमधुर स्वरात चित्रपटातील गाण्यांना चारचाँद लावलेत. संपूर्ण चित्रपट छायाचित्रकार वीरधवल पाटील यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. २८ एप्रिल २०२३ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होण्यास सज्ज होत