आकांक्षा पुराणिक यांच्या “ इच्छापत्र – काळाची गरज”.पुस्तकाचे प्रकाशन.

Share This News

आकांक्षा पुराणिक लिखित “इच्छापत्र – काळाची गरज” या पुस्तकाचे प्रकाशन मा.आ.मेघाताई कुलकर्णी व अधिवक्ता प्रतिभाताई राजेंद्र घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. विश्वकर्मा पब्लिकेशनने याचे प्रकाशन केले. एस.एम.जोशी सभागृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी विशाल सोनी (विश्वकर्मा प्रकाशन), संदीप तापकिर (विश्वकर्मा प्रकाशन), विदुला टोकेकर आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना मा.आ.मेधाताई कुलकर्णी यांनी आपण कामावलेल्या संपत्तीचे आपल्या नंतर कसे वाटप व्हावे हे इच्छा पत्र योग्य वेळी लिहुन ठेवल्यास नंतरचे प्रश्न, वाद होत नाहीत. व कटुता येणे टळते असे प्रतिपादन केले. अधिवक्ता प्रतिभा घोरपडे यांनी या पुस्तकात किचकट विषय साध्या भाषेत लिहिल्याने वकिलच नव्हे तर सर्वसामान्यांनाही या पुस्तकाचा उपयोग होईल असे संगितले. लेखिका आकांक्षा पुराणिक यांनी इच्छा पत्र या आवश्यक बाबी विषयी सर्वत्र उदासिनता दिसते, या विषयावर जनजागृती झाली पाहिजे असे संगितले. पुस्तक १४८ पानी असून किंमत २५० असून मराठी, हिंदी व इंग्रजीत उपलब्ध आहे.

छायाचित्र : डावीकडून संदीप तापकिर,विशाल सोनी,आकांक्षा पुराणिक,मेधाताई कुलकर्णी,प्रतिभाताई घोरपडे.