विधान परिषद उपसभापती मा.ना.नीलमताई गो-हे यांनी आज कात्रज तलाव,राजेश सोसायटी येथील स्पॉट,लेकटाउन स्पॉट,पाहणी केली.पुणें मनपा आयुक्त श्री. विक्रमकुमार , सिटी सिह्विल ईंजिनिअर प्रशांत वाघमारे त्यांच्या समवेत होते . त्यांनी ओढ्याच्या कामा संबंधी मनपाने तयार केलेले सादरीकरण पहिले. यावेळी सुस्मिता शिर्के अधीक्षक अभियंता,ललित बेंद्रे कार्यकारी अभियंता,विशाल तायडे असिस्टंट जनरल मॅनेजर यांनी माहिती दिली.त्यात पुण्यात सुमारे ४३७ ठिकाणी पाणी साठते त्यातील दुरूस्ती काम ३५२ ठिकाणचे झाले आहे असे संगितले.तसेच सध्या धरणा मध्ये २३% साठाच आहे त्यामुळे पुरस्थिती सध्या तरी संभवत नाही असे संगितले.पाहणीच्या शेवटच्या टप्प्यात अंबिल ओढा कारवाई ग्रस्त नागरिकांची भेट घेतली. तेथील नागरिकांनी विविध समस्या मांडल्या.तसेच यापुढील पुनर्वसन प्रश्नात डॉ.गो-हे यांनी लक्ष घालावे असे संगितले. त्यावेळी महानगर पालिकेने आर ७ मधली घरे मिळण्यात मदत करू,तसेच घरभाडे ३००० एवजी ६००० मिळण्यात येतील असे संगितले.तसेच नागरिकांनी सोसायटी लवकर स्थापन करावी.त्यासाठी आवश्यक मदत करणार असल्याचे संगितले.तसेच कोणीही बेघर होणार नाही. नाला सरळ होऊ शकेल का या प्रश्नात मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी लक्ष घातले असल्याचे संगितले.या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे.मा.गटनेते अशोक हरणावळ,नगरसेवक बाळा ओसवाल,राजेंद्र शिंदे,अनंत घरत,तम्मा विटकर,युवराज शिंगाडे,युवराज पारिख आदी मान्यवर उपस्थित होते. छायाचित्र :अंबिल ओढा कारवाई ग्रस्त नागरिकांशी संवाद करताना डॉ.नीलम गो-हे व मान्यवर.