पार्श्वनाथ भगवान जन्मकल्याणक निमित्त वनौषधी अभिषेक.

Share This News

जैन धर्मियांच्या पार्श्वनाथ भगवान जन्मकल्याणक निमित्त तीन दिवसीय जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे ७/८/९ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. आज आचार्य भगवंत जगतचन्द्र सूरीश्वरजी यांच्या उपस्थितीत पार्श्वनाथ भगवान यांच्या मूर्तीवर विशीष्ट वनओषधी मिश्रित दूध व पाणी यांनी अभिषेक करण्यात आला. या प्रसंगी अनेक साधकांनी आठ्ठम उपवास(तीन दिवसीय उपवास) केले आहेत. या प्रसंगी लाभार्थी अ.सौ.प्रमिलाबेन सुमतीलाल वखरचंद शहा, सुधीरभाई शहा, अशोकभाई शहा, चिराग दोशी, धिरूभाई शहा, राजीव शहा, चंपकभाई शहा, आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जैन अॅलर्ट ग्रुपने केले. जगभरातील लाखो जैन अनुयायी हे  आठ्ठम उपवास(तीन दिवसीय) करतात. तसेच या कार्यक्रमांत प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्यात येते असे ट्रस्टी राजीव शहा यांनी नमूद केले.   

छायाचित्र : भगवान मूर्तीवर अभिषेक करतांना भाविक.