“अनधिकृत अतिक्रमणे ग्राहकांना विक्री झाले नंतर पाडण्या ऐवजी आधीच पाडावीत व सर्वसामान्य ग्राहकांचे नुकसान टाळावे”.असे निवेदन नगर अभियंता यांना अ.भा भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने दिले.

Share This News

पुणे मेट्रोपोलीटन शहर झाले असून अनेक बांधकाम व्यावसायिक मान्यता नसलेल्या जागेवर अतिक्रमण करून घरे,गोडवून व अन्य बाबी बांधून विक्री करतात.मात्र याची ग्राहकांना माहिती नसते. अनधिकृत असल्याने ती पडण्यात येतात.व ग्राहकांचे नुकसान होते.यासाठी अशी बांधकामे योग्य वेळीच पाडून कारवाई करावी व ग्राहकांचे नुकसान वाचवावे असे निवेदन शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले.या शिष्टमंडळात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील, कार्याध्यक्ष अकबर शिकलकर,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन खंडागळे, भीमा जमादार पुणे जिल्हा कामगार अध्यक्ष व इतर उपस्थित होते.