*केंद्र सरकारने ‘जीएसटी’मध्ये सुलभता आणावी* – जाचक तरतुदींविरोधात कर सल्लागार, व्यापाऱ्यांचा ‘जीएसटी’ भवनावर देशव्यापी एल्गार

पुणे : वस्तू व सेवा कर कायद्यातील वारंवार होणारे बदल थांबवावेत, जीएसटी परताव्यात सुधारणा करण्याची अनुमती द्यावी, सतत बदलांच्या अध्यादेशाचा मारा थांबवावा, नोंदणी रद्द करण्याची किंवा प्रतिबंधित करण्याचे अधिकारांचे उल्लंघन थांबवावे, अनावश्यक विलंब शुल्क आकारने थांबवावे, जीएसटीमधील ‘एचएसएन’ इ-वे बिल, इनपुट टॅक्स क्रेडिट, कॅश लेजर, क्रेडिट लेजर, अव्हेलेबल, युटीलाईज्ड क्रेडिट सेवा अशा अनेक गोष्टी सुलभ कराव्यात. याशिवाय व्यापारी आणि कर सल्लागार यांच्याकडे बघण्याचा चुकीचा दृष्टीकोन सरकारने बदलावा, अशा अनेक मागण्यांसाठी निषेध आंदोलन करत देशभरातील कर सल्लागारांनी जीएसटी भवनसमोर निदर्शने केली.

‘एक देश-एक कर-एक परतावा’, ‘जीएसटी भुगतान होगा आसान तो भारत बनेगा महान’, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स नव्हे, तर ‘गलत सलत टॅक्स’, ‘हेल्पडेस्क हेल्पलेस’ अशा घोषणांनी जीएसटी भवनाचा परिसर दणाणून गेला. इतिहासात पहिल्यांदाच देशभरातील कर सल्लागार, व्यापारी, सनदी लेखापाल व संबंधित घटक एकत्र येत हे निषेध आंदोलन केले. पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या नेतृत्वात ‘ऑल इंडिया प्रोटेस्ट कमिटी’मार्फत शुक्रवारी देशभर प्राप्तिकर विभागाच्या (जीएसटी) मध्यवर्ती कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. पुण्यात हे आंदोलन वाडिया कॉलेजजवळील जीएसटी (जुने एक्साईज ऑफिस) कार्यालयासमोर झाले. ‘ऑल इंडिया प्रोटेस्ट कमिटी’चे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र सोनावणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष विलास आहेरकर, राष्ट्रीय समन्वयक सीए स्वप्नील मुनोत, कर सल्लागारांचे मेंटॉर गोविंद पटवर्धन, शरद सूर्यवंशी, नवनीत बोरा, सुकृत देव, व्यापारी संघटनेचे महेंद्र पितळिया, सीए डॉ. अशोककुमार पगारिया आदी उपस्थित होते.

नरेंद्र सोनावणे म्हणाले, “केंद्र सरकराने लागू केलेल्या वस्तू व सेवा करातील जाचक अटी, तरतुदी व किचकट संगणक प्रणाली या विरोधात आमचे हे आंदोलन आहे. सरकारविरोधात किंवा कायद्याच्या विरोधात आम्ही नाहीत. कर सल्लागार, सर्व छोटे-मोठे व्यापारी, उद्योजक यांना कर कायद्यांची पूर्तता करताना अनेक अडचणी येताहेत. गेल्या तीन ते पांच वर्षात कर प्रणालीतील तरतुदी अधिकाधिक जाचक झाल्या आहेत. वारंवार नियम बदलण्यात येत असल्याने करप्रणाली किचकट झाली आहे. विलंब शुल्क अनावश्यक लावले जात आहे. परताव्यात चूक झाल्यास दुरुस्त करता येत नाही. जीएसटी पोर्टल व्यवस्थित चालत नाही, अशा असंख्य अडचणी आहेत. दरवर्षी किचकट तरतुदी आणि पूर्तता करण्याचे ओझे शासनाने प्रामाणिक करदात्यांवर लादले आहे. त्यात लहान, मध्यम प्रामाणिक व्यापारी भरडले जात आहेत. याच अयोग्य कर कायद्याच्या अंमलबजावणी विरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी हे निषेध आंदोलन आहे. भारतभरातून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, २०० पेक्षा अधिक व्यापारी, कर सल्लागार संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत.”

“देशभरात विविध ठिकाणी खासदारांना यासंदर्भात निवेदने दिली असून, संसदेत हा प्रश्न उपस्थित करण्याचे आवाहन केले आहे. हेच निवेदन आम्ही जीएसटी मुख्य आयुक्त यांनाही दिले आहे. लवकरच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही हे निवेदन देण्यात येणार आहे. या ऐतिहासिक आंदोलनाची दखल घेऊन केंद्र सरकारने व्यापारी, कर सल्लागार, सनदी लेखापाल व संबंधित घटकांच्या अडचणी समजून घ्याव्यात व जीएसटी अंमलबजावणीत योग्य ते बदल करावेत. केलेले बदल कायम ठेवावेत, अशी आमची विनंती आहे,” असे विलास आहेरकर यांनी नमूद केले.

“कायद्यातील जाचक तरतुदींचा निषेध म्हणून सर्व कर सल्लागार, सनदी लेखापाल काळे कपडे परिधान करून, काळ्या फिती लावून निषेध केला. लहान, मध्यम व्यापाऱ्यांवरील कर कायद्याच्या पूर्ततेच्या तरतुदी कमी आणि सुसह्य कराव्यात. कायद्यात, फॉर्ममधील बदल दर वर्षी १ एप्रिलला लागू होतील, याची दक्षता घ्यावी, दुरुस्तीची सोय करावी, अशा आमच्या मागण्या आहेत. कर सल्लागार हे शासन आणि व्यापारी/उद्योजक यातील दुवा आहेत. कर सल्लागार आणि सनदी लेखापालांवर कामाचा बोझा वाढला आहे. तो कमी करण्यासाठी केंद्र सरकारने योग्य ती पावले उचलावीत,” असे सीए स्वप्नील मुनोत यांनी सांगितले. (more…)

Continue Reading*केंद्र सरकारने ‘जीएसटी’मध्ये सुलभता आणावी* – जाचक तरतुदींविरोधात कर सल्लागार, व्यापाऱ्यांचा ‘जीएसटी’ भवनावर देशव्यापी एल्गार

नवनाथ फडतरे यांची जवाहरलाल नेहरु विद्यापीठात निवड

पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील नवनाथ फडतरे यांची जे.एन.यु अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठ ,दिल्ली येथे 'मास्टर आॅफ फिलाॅसाॅफी इन चायनीज स्टडीज' या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.नुकतेच प्रवेश परिक्षांचे निकाल जाहीर झाले…

Continue Readingनवनाथ फडतरे यांची जवाहरलाल नेहरु विद्यापीठात निवड

जगातील सर्वात मोठी टॉवेल उत्पादक कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात ६ शोरूम उघडली.

जगातील सर्वात मोठी टॉवेल उत्पादक कंपनी ट्रायडंट एक्स्क्लुझिव्ह लिमिटेड  यांनी पुण्यात शिल्पा फर्निशिंग ५२ मुकुंद नगर,युको बँके समोर येथील शोरूमचे उद्घाटन ट्रायडंट लिमिटेडचे नॅशनल हेड नवनितसिंग खुराना यांच्या हस्ते करण्यात…

Continue Readingजगातील सर्वात मोठी टॉवेल उत्पादक कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात ६ शोरूम उघडली.

मी टू वुई मिशन-२०३४ च्या वतीने डॉ.दीपक तोषणीवाल यांना कोविड योद्धा पुरस्कार.

मी टू वुई २०३४ या सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. दीपक तोषणीवाल यांचा कोरोना महामारीच्या काळात केलेल्या सामाजिक सेवेसाठी कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित केले. महात्मा फुले सभागृह येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या…

Continue Readingमी टू वुई मिशन-२०३४ च्या वतीने डॉ.दीपक तोषणीवाल यांना कोविड योद्धा पुरस्कार.

शहीद अब्दुल हमीद तरुण मंडळाच्यावतीने झेंडा वंदन.

७१व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शहीद अब्दुल हमीद तरुण मंडळाच्यावतीने झेंडा वंदन व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.पिपल्स मिडिया इंडिया न्यूज पोर्टलचे संपादक राजेंद्र सोनार व सामाजिक कार्यकर्त्या छाया विजय वारभुवन यांच्या…

Continue Readingशहीद अब्दुल हमीद तरुण मंडळाच्यावतीने झेंडा वंदन.

स्वामी बॅग्ज व प्रसन्नदादा जगताप मित्र परिवार यांच्या वतीने सिंहगड पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधक किट व तिळगूळ वाटप संपन्न.

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोरोना काळात जनतेची सेवा व रक्षण करण्यात अग्रेसर असलेल्या सिंहगड पोलिस स्टेशनच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना स्वामी बॅग्ज व प्रसन्नदादा मित्र परिवाराच्या वतीने कोरोना प्रतिबंधक किट व…

Continue Readingस्वामी बॅग्ज व प्रसन्नदादा जगताप मित्र परिवार यांच्या वतीने सिंहगड पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधक किट व तिळगूळ वाटप संपन्न.

*’जीएसटी’तील कर सल्लागारांचा देशव्यापी एल्गार* – शुक्रवारी देशभरातील ‘जीएसटी’च्या मध्यवर्ती कार्यालयासमोर निषेध आंदोलन

पुणे : केंद्र सरकराने लागू केलेल्या वस्तू व सेवा करातील जाचक अटी, तरतुदी व किचकट संगणक प्रणाली या विरोधात देशभरातील कर सल्लागार, व्यापारी, सनदी लेखापाल व संबंधित घटक एकवटले आहेत. ‘जीएसटी’तील तरतुदींविरोधात देशभरातील कर सल्लागारांनी येत्या शुक्रवारी (ता. २९ जानेवारी) देशभरात एल्गार पुकारला आहे. पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या नेतृत्वात ‘ऑल इंडिया प्रोटेस्ट कमिटी’मार्फत शुक्रवारी सकाळी १० वाजता देशभर प्राप्तिकर विभागाच्या (जीएसटी) मध्यवर्ती कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यात हे आंदोलन वाडिया कॉलेज जवळील जीएसटी (जुने एक्साईज ऑफिस) कार्यालयासमोर सकाळी १० वाजता होणार आहे, अशी माहिती ‘ऑल इंडिया प्रोटेस्ट कमिटी’चे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र सोनावणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष विलास आहेरकर, राष्ट्रीय समन्वयक सीए स्वप्नील मुनोत, कर सल्लागारांचे मेंटॉर गोविंद पटवर्धन, मनोज चितळीकर, शरद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

नरेंद्र सोनावणे म्हणाले, “भारतातील कर सल्लागार, सर्व छोटे-मोठे व्यापारी, उद्योजक यांना कर कायद्यांची पूर्तता करायची असते. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण व्हावी, या तणावात ते असतात. छोट्या मध्यम व्यापाऱ्यांना खरेदी-विक्री, वसूली, बँक लोन, हिशोब, कर कायदे पूर्तता ही सर्व कामे स्वत: करावी लागतात. गेल्या तीन ते पांच वर्षात कर प्रणालीतील तरतुदी अधिकाधिक जाचक झाल्या आहेत. कर खात्यास कर चुकविणाऱ्यांना जेरबंद करता येत नाही. म्हणून दर वर्षी किचकट तरतुदी आणि पूर्तता करण्याचे ओझे शासनाने प्रामाणिक करदात्यांवर लादले आहे. त्यात लहान, मध्यम प्रामाणिक व्यापारी भरडले जात आहेत. याच अयोग्य कर कायद्याच्या अंमलबजावणी विरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी निषेध नोंदविण्याचे आम्ही ठरवले आहे. या निषेध अभियानाला भारतभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अनेक व्यापारी संघटनाही यामध्ये सहभागी होत आहेत.”

“कर सल्लागार यांची राष्ट्रीय शिखर संघटना नाही. ते देशभर विखुरलेले आहेत. त्यामुळे निषेध विविध प्रकारे नोंदविला जाणार आहे. पुण्यातील जीएसटी कार्यालय आणि प्राप्तिकर कार्यालय येथे निषेध नोंदविण्यात येणार आहे. त्यादिवशी सर्व कर सल्लागार, सनदी लेखापाल काळे कपडे परिधान करून, काळ्या फिती लावून काम करतील. लहान, मध्यम व्यापाऱ्यांवरील कर कायद्याच्या पूर्ततेच्या तरतुदी कमी आणि सुसह्य कराव्यात. कायद्यात, फॉर्ममधील बदल दर वर्षी १ एप्रिलला लागू होतील, याची दक्षता घ्यावी. ‘जीएसटी’पूर्वी जास्त सुखी होतो, अशीही भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. मलेशियात असंतोष झाल्याने जीएसटी रद्द करावा लागला. तसे येथे होऊ नये, अशी प्रामाणिक इच्छा आहे,” असेही सोनावणे यांनी नमूद केले.

विलास आहेरकर म्हणाले, “प्राप्तिकर कायद्यातील टीडीएस, टीसीएस, कधी लागते, किती लागते, जीएसटीमधील ‘एचएसएन’ इ-वे बिल, इनपुट टॅक्स क्रेडिट, कॅश लेजर, क्रेडिट लेजर, अव्हेलेबल, युटीलाईज्ड क्रेडिट सेवा अशा अनेक गोष्टी व्यापाऱ्याना कळत नाही. काही रिटर्न दरमहा तर काही तिमाही भरावे लागतात. ‘जीएसटी’मध्ये प्रत्येक महिन्याचे रिटर्न दुरुस्त करण्याची सोय नाही. मोठ्या कंपन्यांमध्ये कर कायद्याची पूर्तता करण्यासाठी स्वतंत्र विभाग असतो. छोट्या व्यापाऱ्यांकडे ती सोय नसल्याने त्यांना कर सल्लागार, चार्टर्ड आकाऊंटंट यांची मदत घ्यावी लागते. कर सल्लागार हे शासन आणि व्यापारी/उद्योजक यातील दुवा आहेत. जाचक अटींमुळे सनदी लेखापालांना प्रत्येक तरतुदीची माहिती घेऊन काम करावे लागते. पूर्वी ४०-५० व्यापाऱ्यांची कामे एक व्यक्ती करू शकत होता. आता ते शक्य होत नाही. शिवाय विविध कायदे नीट माहीत असणारे सक्षम सहाय्यक मिळत नाहीत. त्यामुळे केलेले काम पुनः पुन्हा तपासावे लागते. यामुळे कर सल्लागार आणि सनदी लेखापालांवर कामाचा बोझा वाढला आहे. यावर्षी कोरोनामुळे कामाच्या वेळांवर बंधने आली. अनेक व्यापारी आर्थिक अडचणीत आले. सहाय्यक आपापल्या गावी गेले. या पार्श्वभूमीवर ऑडिट पूर्ण करण्याची मुदत शासन वाढवून देईल, अशी खात्री होती. मात्र, ही मुदत वाढविण्यात आली नसल्याने अनेकांवर मानसिक ताण आला असून, तीन वर्षे अथक श्रमाने थकलेले कर सल्लागार, चार्टर्ड आकाऊंटंट यांचा संयम संपला आहे.” (more…)

Continue Reading*’जीएसटी’तील कर सल्लागारांचा देशव्यापी एल्गार* – शुक्रवारी देशभरातील ‘जीएसटी’च्या मध्यवर्ती कार्यालयासमोर निषेध आंदोलन

शिवसेना माया बेकरी शाखेच्या वतीने हळदीकुंकू व वाण वाटप.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना माया बेकरी शाखेच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व वाण वाटप करण्यात आले. याचे आयोजन प्रभाग प्रमुख हनुमंत दगडे,महिला शाखा प्रमुख सुनीता दगडे,शाखा प्रमुख…

Continue Readingशिवसेना माया बेकरी शाखेच्या वतीने हळदीकुंकू व वाण वाटप.

मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्त शिवसेना खडकमाळआळी शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त शिवसेना शाखा खडकमाळआळी च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शहर प्रमुख संजय मोरे,आयोजक चंदनदादा साळुंखे,गटप्रमुख पृथ्वीराज सुतार.नगरसेवक विशाल धनवडे,उपशहर प्रमुख उमेश गालीनदे,शहर…

Continue Readingमा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्त शिवसेना खडकमाळआळी शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.