प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या काळात आपल्या प्रखर वक्तृत्वाने,लिखाणा द्वारे,समजतील चुकीच्या रूढी विरुद्ध लढा दिला.महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेला लढा त्यांनी पुढे नेला.समाजातील सती,जातीय भेदभाव यांना जिवाची व प्रखर विरोधाची पर्वा न करता या बाबींवर आसूड ओढले.ज्यातील अनेक बाबी अजूनही समाजमनात तग धरून आहेत.त्यांना झालेल्या विरोधाची आपण कल्पनाच करू शकतो कारण आजूनही अशा प्रवृत्ती शिल्लक आहेत.म्हणूनच त्यांनी केलेल्या कार्याची माहिती आजच्या समाजाला व्हावी व त्या विचारांचे आजही प्रसार व्हावा ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन भारताच्या माजी राष्ट्रपती महामाहीम प्रतिभाताई पाटील यांनी केले.समाजसुधारनेसाठी अग्रणी असलेल्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधन पक्षिकाच्या शतकोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले.हा महोत्सव २० ते २६ जानेवारी या कलावधीत संपन्न होणार आहे. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी देविसिंह शेखावत,महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलमताई गो-हे,शतकोत्सवाचे संयोजक संवाद पुणेचे सुनील महाजन,निकिता मोघे,हरिष केंची,विशाल चोरडिया,शैलेश गुजर,सचिन ईटकर,किरण साळी आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना ना.डॉ.नीलमताई गो-हे यांनी अनेक राज्यांत अजूनही महिलांवर अत्याचार होतात,आजच्या काळात प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,महाराष्ट्र राज्यातील विधानपरिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती पदाचा मान मला मिळाला यात प्रबोधनकार ठाकरे,महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचाच हातभार आहे असे मला वाटते.तसेच अनेकजण हिंदुत्वा विषयी विचारतात तेव्हा आम्ही प्रबोधनकारांचे हिंदुत्व मानतो ज्यात जातपात व वाईट रूढीचा समावेश नाही.व याच विचारांचा प्रसार करण्याचा आम्ही प्रयत्न करतो असे संगितले..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शैलेश गुजर यांनी केले.
छायाचित्र :बोधचिन्हाचे अनावरण करताना मान्यवर.