पुणे (दि.२२) जनसंपर्क कार्यालय हे फक्त कामे करण्यासाठीच नसते कारण सर्वच कामे होतात असे नाही,मात्र नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे,व त्याचा पाठपुरावा करणे,नागरिक संपर्क ही महत्वाचा असतो” असे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.चंद्र्कांतदादा पाटील यांनी केले. मा. नगरसेविका वृषालीताई कामठे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रभाग ४१ कोंढवा बु येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी भाजप शहर अध्यक्ष आ.जगदीश मुळीक,कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश टिळेकर (प्रदेश अध्यक्ष ओबीसी मोर्चा म.प्र),उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे,नगरसेवक विरसेन जगताप,रवी अनासपूरे,जलिंधर कामठे रंजनाताई टिळेकर(नानी),कैलासबापू कामठे,ईसाकभाई पानसरे,मुबारक शेख आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकवर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना चंद्र्कांत पाटील यांनी “जनसंपर्क कार्यालयाने सर्वच कामे होतात असे नाही,टीआर काही कामे मार्गी लागतात,नागरिक व नगरसेवक संपर्क होतो व जनतेत आपले म्हणणे ऐकन्यास कुणी आहे याचे समाधान वाटते”. असे संगितले.
छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी वृषाली कामथे,चंद्र्कांत पाटील वृषाली कामठे व अन्य मान्यवर