आयईईई पुणे विभागाच्या वतीने केक कापून व मागर्दर्शक सत्राने जागतिक महिलादिन साजरा

Share This News

पुणे (दि.८) आयईईई पुणे विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त केक कापून व मार्गदर्शक सत्राचे आयोजन करून साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फौंडेशन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी जपान येथील डॉ.टकाको हशिमोटो(डायरेक्टर आय ईईई रिजन १०) व डॉ.अरुणा कटारा(होप फौंडेशन) यांच्या हस्ते केक कापण्यात आला. या प्रसंगी डॉ.आदित्य अभ्यंकर( तंत्रज्ञान विभाग प्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) ,अमर बुचडे(चेअर आयईईई पुणे विभाग), डॉ.सिमरन खियानी(चेअर WIE आयईईई पुणे), डॉ.ज्योती भाकरे(इंचार्ज रजिस्ट्रार SPPU), अभिजित खुरपे (सेक्रेटरी आयईईई पुणे विभाग) आदी मान्यवरांच्या बरोबरच मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना प्रमुख मार्गदर्शक डॉ.टकाको हाशीमोटो यांनी महिलांनी यशस्वी होण्यासाठी कौशल्य,जनसंपर्क या बरोबरच कुटुंबाकडून पाठींबा मिळवायला हवा,कुटुंबाच्या आधार असल्यास यश मिळवता व टिकवता येते असे सांगितले. या प्रसंगी आयोजित चर्चा सत्राचे संचालन डॉ.राजश्री जैन (चेअर,एज्युकेशन सोसायटी,ieee पुणे सेक्शन) यांनी केले.
छायाचित्र : केक कापतांना टकाको हशिमोटो, अरुणा कटारा व अन्य मान्यवर.