पुणे (दि.९) जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सबलीकरण व सन्मान यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स टिळक रोड येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी आयोजक प्राची बोरकर(संस्थापक पेहचान स्त्री शक्ती की), आशा नेगी (अभिनेत्री व मॉडेल व लेखिका,कॅन्सर वॉरीयर), डॉ.हर्षाली मुरुडकर, भाग्यश्री बोरकर, किरण बोरकर,स्नेहा शेवाळे, आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील कर्तुत्ववान महिला उपस्थिती होत्या. त्यांचा मानपत्र देवून सन्मान करण्यात आला
छायाचित्र : सत्कारार्थी व मान्यवर यांचे समूहचित्र.