विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचा वाढदिवस आज अत्यंत साध्या परंतु उत्साहच्या वातावरणामध्ये संपन्न झाला. त्या निमित्ताने शिवसेना महिला आघाडीने अनेक दीप असणारी ताटे ठेवून त्या ज्योतींमध्ये त्यांचं औक्षण केलं. हे औक्षण करणाऱ्या मध्ये शिवसेना महिला पदाधिकारी ही उपस्थित होत्या. दिवसभरामध्ये सोलापूर, पुणे जिल्हा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमधून पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन व अनेकांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये त्यांना ज्या ज्या सगळ्या नेत्यांनी सहकार्य दिले त्यांचे आभार मानले. *विशेषतः हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नामदार एकनाथ शिंदे*, त्याचबरोबर शिवसैनिक व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे आभार मानले. पुणे शहर हे अधिक सुरक्षित व्हावे, त्याचबरोबर महाराष्ट्राची प्रगती गतिमान बनत असताना समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी होण्यासाठी आपले प्रयत्न चालले आहेत हे स्पष्ट केले.
पुढील काळामध्ये काम करत असताना ललित लिखाण करणे त्याचबरोबर कथा व कादंबरी याच्या माध्यमातून रसिक वाचकांशी जोडले जाणे हे आवश्यक आहे असे त्यांनी व्यक्त केले.
तसेच पुण्यात जे वाहतुकीचे कोंडीचे प्रश्न आहेत व स्त्रियांच्या सुरक्षिततांचे प्रश्न आहेत त्याचबरोबर शिक्षण झाल्यावर कौशल्य विकास मध्ये महिलांना सहभागी करून घेण्याचे विषय या विषयांमध्ये प्राधान्याने काम करणार असल्याचे स्पष्ट केलं. शाश्वत विकास उद्दिष्टांवरती अधिक कामाची गरज देखील त्यांनी या निमित्ताने व्यक्त केली.*
*भारतात एकूण सहा राज्यांमध्ये विधानपरिषद आहेत. मुंबईतील विधिमंडळामध्ये या सहा राज्यातल्या विधान परिषदेचे सभापती आणि विधान सभेचे अध्यक्षांना बोलवून त्यांची एक वैचारिक गोलमेज परिषद घेण्याचा सुद्धा त्यांनी विचार व्यक्त केला.यासाठी एमआयटी पुणे यांचे सहकार्य घेण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा सकारात्मक भूमिका घेतली.*
या प्रसंगी विधान परिषद आमदार निरंजन डावखरे व शिवाजी नगर विधानसभा आमदार सिद्धार्थ शिरोळे व इतर मान्यवर उपस्थित होते