पुणे (दि.१०) देशातील जुने तीन कायदे बदलून नवे लागू करण्यात आले आहेत. IPC म्हणजे इंडियन पिनल कोड आता भारतीय न्याय संहिता झाला आहे.CRPC कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आता भारतीय सुरक्षा संहिता झाला आहे.IEA इंडियन इव्हीडन्स अॅक्ट आता भारतीय साक्ष अधिनियम झाले आहे.या बदलांची कायदे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या हेतूने श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यलय येथे प्रसिद्ध कायदेतज्ञ अॅड एस.के.जैन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करतांना अॅड एस.के.जैन यांनी “ब्रिटिशांनी भारतावर राज्य करता यावे यासाठी दमनकारी अशा कायद्यांची निर्मिती केली.मात्र आता काळ,जागतिक व्यवस्था व तंत्रज्ञान खूप बदलले आहे.त्यामुळे हे परतंत्र काळात बनलेले कायदे बदलणे आवश्यक होते”.असे प्रतिपादन केले. श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड.अशोक पलांडे,प्राचार्या डॉ.सुनिता आढाव, आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. सहाय्यक प्राध्यापक हनुमंत दोडके यांनी आभार प्रदर्शन केले.
छायाचित्र : मार्गदर्शन करतांना अॅड एस.के.जैन