खासदार डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे डोंगरी दुर्गम भागातील नागरिकांसाठी रुग्णवाहिका सावित्री महिला प्रतिष्ठान लोकार्पण सोहळा पौड येथे संपन्न ,, खासदार मा श्री श्रीकांत जी शिंदे फाउंडेशन तर्फे डोंगरी दुर्गम भागातील नागरिकांसाठी रुग्णवाहिका देण्यात आली यासाठी सौ कांताबाई पांढरे शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी पुणे संस्थापक अध्यक्ष सावित्री महिला प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडे रुग्णवाहिकाची मागणी केली होती मुळशी तालुक्यातील आसपासच्या गावातील डोंगरी दुर्गम भागातील तसेच आदिवासी भागातील माता-भगिनींचे व नागरिकांचे तसेच शालेय विद्यार्थ्यांचे रुग्णांचे खूप हाल होत होते यांना वेळेवर उपचार साठी रुग्णवाहिकाची अत्यंत गरज होती ही गरज ओळखून ही रुग्णवाहिका देण्यात आली या रुग्णवाहिकाच्या माध्यमातून सर्व स्तरातील नागरिकांना उपचारासाठी लवकरात लवकर दवाखान्यात जाता यावा वेळेत उपचार होण्यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे असे मत सौ कांताबाई पांढरे शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी पुणे , संस्थापक अध्यक्षा सावित्री महिला प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी मात व्यक्त केले कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये मा श्री संतोष कुंभार A P I, मा श्री बाळासाहेब चांदेरे शिवसेना जिल्हाप्रमुख पुणे, सौ गीतांजली ताई ढोणे संपर्कप्रमुख शिवसेना बारामती लोकसभा,मा श्री शरद राव रासकर सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा,प्रदेश सल्लागार सावित्रा महिला प्रतिष्ठान, सौ सारिका पवार संपर्कप्रमुख शिवसेना शिरूर लोकसभा, सौ ,शैला पाचपुते शिवसेना मावळ जिल्हाप्रमुख, सौ , श्रीमती भोरी वाघमारे आदिवासी महिला आधी बचत गट महिला तसेच शिवसेना पदाधिकारी आदी मान्यवर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते हा कार्यक्रम मंगळवार दिनांक 12/3/2024 रोजी पौड तहसीलदार कचेरी समोर तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न झाला आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार सौ कांताबाई पांढरे शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी पुणे , संस्थापक अध्यक्षा सावित्री महिला प्रतिष्ठान ,व मा श्री शरदराव रासकर प्रदेश सल्लागार सावित्री महिला प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो,छत्रपती शिवाजी महाराज की जय ,भारत माता की जय, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता अशी माहिती सौ कांताबाई पांढरे शिवसेना जिल्हा प्रमुख महीला आघाडी पुणे, संस्थापक अध्यक्षा सावित्री महिला प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा,प्रदेश सल्लागार सावित्री महिला प्रतिष्ठान यांनी दिली आहे