दोन दिवसीय सातव्या आशिया आफ्रिका विकास आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन संपन्न.

Share This News

पुणे (दि.१)डॉ.डी.वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज.(आकुर्डी). यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय आशिया आफ्रिका विकास आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.शांताई सभागृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी कार्यकारी संचालक भारत चव्हाण पाटील, DYPMS चे डायरेक्टर व या परिषदेचे चेअरमन डॉ.कुलदीप चरक, प्रमुख पाहुणे पुणे मेट्रोचे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर डॉ.हेमंत सोनवणे, एस बँकेचे व्हाईस चेअरमन कर्नल सुनील अरविंदन(रिटा), DRDAच्या च्या प्रोजेक्ट डायरेक्टर शालिनी कडू, सरदार पटेल युनिव्हार्सिटीचे कुलगुरू योगेश जोशी, डॉ.अभय कुलकर्णी आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना डॉ.सुरेश गोसावी यांनी संशोधन हे लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्हायला हवे,तसेच बदलत्या हवामानात पर्यावरणास हानी होऊ नये याची काळजी घ्यायला हवी असे प्रतिपादन केले. सूत्रसंचालन मीनल वाघ यांनी केले.आभार प्रदर्शन डॉ.अविनाश पवार यांनी केले. छायाचित्र : डावीकडून डॉ.कुलदीप चरक, डॉ.भारत चव्हाण पाटील,कर्नल सुनील अरविंदन,डॉ.अभय कुलकर्णी,कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी