महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री ना.मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शक्ती गट रजिस्टर पासबुकचे प्रकाशन .

Share This News

पुणे जिल्ह्यामध्ये संसद रत्न लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब विधान परिषदेच्या उपसभापती महिलांच्या लाडक्या नेत्या .आदरिणीय डॉक्टर नीलम ताई गोऱ्हे, माजी मंत्री शिवसेना उपनेते विजय बापू शिवतारे , ‌‌ शिवाजीराव आढळराव पाटील . खासदार म्हाडाचे अध्यक्ष ,श्रीरंग आप्पा बारणे संसद रत्न खासदार,संजय जी मशिलकर संपर्कनेता‌ पुणे सौ गीतांजली ढोणे संपर्कप्रमुख बारामती लोकसभा यांच्या नेतृत्वात संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये महिला शक्ती गटाचे काम चालू केले आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांनी महिला सशक्तीकरणा वर भर दिला आहे . महिला शक्ती गटातील एक कोटी महिलाना महिला सशक्तिकरणात जोडण्याचे उद्दिष्ट आहे .जेणे करून गरजु महिला पर्यंत योजना कशा पोहचतील . आमचे एवढेच उद्दिष्ट आहे प्रत्येक गोरगरीब महिलेला याचा लाभ मिळाला पाहिजे . शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी सौ कांताताई पांढरे यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते शक्ती गटाचे उद्घाटन केले . ज्या प्रमाणे शासन आपल्या दारी कार्यक्रमात शासकीय योजनेचा सर्वांना लाभ मिळाला .तसाच हा उपक्रम आहे . शिवसेना आपल्या दारी योजना येतील घरोघरी . शक्ती गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळेल. दहा महिलांचा ग्रुप करून शक्ती कट केला तर त्या शक्ती गटाला तीस हजार रुपये अनुदान मिळेल. वीस लाखापर्यंत बचत गटाला कर्ज मिळेल बिना कारण एकच उदाहरण सांगते जर आपण कुठल्याही बँकेत जर पर्सनल लोन घ्यायला गेलात तर ते बँक मॅनेजर म्हणतील ताई तुमच्या नावावर काय आहे कर्जाचे कारण काय तुम्ही तारण काय देणार तसे तुम्ही शक्ती गटात असाल तर तुम्हाला कुठलाच बँक मॅनेजर काही विचारणार नाही कर्जाचे कारण नाही तारण नाही फक्त मेंबर व्हा तुम्हाला विनातारण व्यवसायासाठी पण कर्ज मिळतील गटात नसेल तर एखाद्या सावकाराकडे गेला कितीतरी दुप्पट दराने आपल्याला पैसे घ्यावे लागतात पण बचत गटांमध्ये अगदी बँकेच्या व्याज दरानेच आपल्याला कर्ज उपलब्ध होते . हिंजवडी सारख्या आयटी पार्क कुठलीही औद्योगिक वसाहत कंपनी मध्ये इच्छुक महिला शक्ती गटांना कॅन्टीन चालवण्यासाठी शिफारस दिली जाईल यापुढे महिला बचत गटांना यापुढे महिला बचत गटांना बचत गट म्हणायचे नाही यापुढे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे महिला शक्ती गट हीच खरी महिलांची ताकद हीच खरी महिलांची शक्ती आहे म्हणून तर सर्व महिलांनी शक्ती गटात सामील व्हा. असी माहिती सौ. कांताताई पांढरे. जिल्हा प्रमुख महिला आघाडी यांनी दिली .